Thursday, April 2, 2026

आयंबिल ओलीसाठी महाराष्ट्र सरकारचा हातभार! जैन समाजाने मानले सरकारचे आभार; आयंबिल ओलीमुळे 60–70% गॅस बचत


मुंबई, (महासागर वृत संस्था):
संपूर्ण भारतात दरवर्षी हजारोंच्या संख्येने जैन संप्रदायामार्फत आयंबिल ओलीचे आयोजन केले जाते. या पवित्र प्रसंगी जैन समाजासाठी पुरेशा प्रमाणात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देत आमच्या धार्मिक विधींचे सुरळीतपणे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे. याबद्दल संपूर्ण जैन समाज महाराष्ट्र राज्य सरकारचा अत्यंत आभारी आहे. अलीकडे निर्माण झालेल्या जिओ-पॉलिटिकल परिस्थितीमुळे एलपीजी गॅस (LPG GAS) संदर्भात जी समस्या निर्माण झाली होती, तिच्या निराकरणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने उचललेली तात्काळ आणि कौतुकास्पद पावले याबद्दल आम्ही संपूर्ण जैन समाजाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

जैन धर्मात आयंबिल ओली हा अतिशय कठोर आणि शिस्तबद्ध तप (उपवास साधना) मानला जातो. आयंबिल ओलीच्या नियमांनुसार दिवसभरात फक्त एकदाच भोजन (एकासन) केले जाते. या भोजनात तेल, तूप, मसाले आणि फोडणी नसलेले, उकडलेले, साधे आणि कमी शिजवलेले अन्न घेतले जाते. अनेकजण कच्चे किंवा हलके उकडलेले अन्नही ग्रहण करतात. आयंबिल ओलीतील अन्न बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असते.

सामान्य दिवसांमध्ये गॅस (LPG) चा वापर जास्त प्रमाणात होतो, कारण दिवसातून २–३ वेळा स्वयंपाक केला जातो. फोडणी, तळणे, पोळी, भाजी इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि गॅस जास्त वेळ पेटलेला राहतो. परंतु आयंबिल तपामध्ये फक्त एकदाच अन्न बनवल्यामुळे सुमारे ६०–७०% गॅसची बचत होते. साधारणतः एक गॅस सिलिंडर ३० दिवस चालतो, तर आयंबिल काळात तोच सिलिंडर ४५–६० दिवसांपर्यंत चालू शकतो.

अनेक घरांमध्ये सामूहिक आयंबिल (एकत्र भोजन) केले जाते, ज्यामुळे कमी भांडी वापरली जातात आणि कमी स्वयंपाक केल्यामुळे गॅसची आणखी बचत होते. आयंबिल ओलीमध्ये साधे आणि कमी शिजवलेले अन्न असल्याने गॅस जळण्याचा वेळही कमी असतो. या संपूर्ण आयंबिल अनुष्ठानात हजारोंच्या संख्येने गॅस सिलिंडरची बचत झाली आहे, जी जैन समाजासाठी अभिमानाची बाब आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे संपूर्ण जैन समाजात सकारात्मक संदेश गेला आहे आणि लोकांचा सरकारवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

No comments:

Post a Comment