मुंबई,८ जुलै, २०२५ (महासागर): भारताच्या वेलनेस क्षेत्रासाठी एका ऐतिहासिक पर्वणी ठरलेल्या 'गायत्रीएआय'ने सोमवार, ७ जुलै रोजी मुंबईतील अंधेरी येथे त्यांचे 'एआय' आधारित क्वांटम वेलनेस सेंटर सुरू केले. 'क्वालिमाइंड्स कॉर्प सर्व्हिसेस लिमिटेड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि फार्मा उद्योगातील एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक श्री. के. आनंद वेंकट राव, तसेच बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटी पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत क्वांटम वेलनेस सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतात अतिशय सुलभ आणि एआय आधारित सकल रोगनिवारक उपचार पद्धतीच्या (थेरपी) एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे.
नव्याने उद्घाटन झालेल्या केंद्रात एनएलएस बायोरेसोनन्स ४डी निदानोपयोगी औषधेमुक्त आरोग्य पुनर्वसन उपकरण मेटाट्रॉन मेटापॅथिया, मेटाट्रॉन झेड १०० प्लाझ्माहील एक्स४, नारिया चेअर (टेस्लाटेकपेक्षाही श्रेष्ठ), स्केलर ३६० क्यूआय कॉइल™️, झेड-१०० क्वांटम बायो-स्टिम्युलेटर आणि प्रगत हायड्रो-कोलन उपचार प्रणाली यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे समर्थित असलेल्या उपचारात्मक कल्याण मापदंडाद्वारे एकत्रित केले आहेत, जे वैयक्तिक आणि भविष्यसूचक उपचार प्रदान करतात.
'गायत्रीएआय'मध्ये आम्ही प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आरोग्याची निरंतर जबाबदारी घेण्यास सक्षम बनवण्यावर विश्वास ठेवतो," असे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. धर्मप्रकाश त्रिपाठी म्हणाले. 'जिथे मानवी कौशल्यांद्वारे वैज्ञानिक कल्पकतेची जोड देऊन महत्त्वपूर्ण आणि आवश्यक उपचार दिले जातात, अशा दृष्टिकोनाचे 'गायत्री एआय' हे एक प्रतीक आहे, असेही त्यांनी सांगितले. 'गायत्री-एआय'च्या संस्थापक श्रीमती शोभना डीपी त्रिपाठी म्हणाल्या, 'सुदृध आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव, असे नाही - तर ते संतुलन, जीवनशक्ती आणि उद्देश आदींचा सहवास असते', असे 'गायत्री एआय'च्या संस्थापक शोभना डीपी त्रिपाठी म्हणाल्या. 'आमची परिसंस्था तंत्रज्ञान, अंत:स्फूर्ती आणि करुणा यांना एकत्रित करून त्या प्रवासाला अर्थपूर्णपणे सहकार्य करते', असेही त्यांनी पुढे नमूद केले.
क्वालिमाइंड्स कॉर्प सर्व्हिसेसचे एमडी आणि सीईओ, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे माजी उपाध्यक्ष, लुपिनचे माजी अध्यक्ष, ग्लेनमार्कचे माजी अध्यक्ष, कॅडिला (झायडीज) चे माजी उपाध्यक्ष आणि जागतिक प्रमुख आणि 'निकोलस पिरामल'चे माजी उपाध्यक्ष श्री. के. आनंद वेंकट राव उद्घाटन सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले, 'भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पारंपरिक आरोग्य मूल्यांना कसे सक्षम बनवता येते याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे गायत्री-एआय आहे'. हे केंद्र संपूर्ण भारतात आरोग्य सक्षमीकरणाच्या चळवळीला प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अग्रगण्य वेलनेस केंद्राच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला चार चांद लावण्यासाठी ईशा कोपीकर आणि निहारिका रायजादा सेलिब्रिटी उपस्थित होत्या. या सर्वांच्या चमकदार उपस्थितीने हा उद्घाटन सोहळा अधिकच उजळून निघाला. उपस्थित मान्यवरांना एनएलएस बायोरेसोनन्स, क्यूआय कॉइल™️ स्केलर उपचार, प्लाझ्माहील एक्स४, एचएचओ इनहेलेशन आणि प्रगत हायड्रो-कोलन उपचार प्रणालीसारख्या वैशिष्ट्यीकृत उपचारांचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच केंद्रातील अत्याधुनिक सुविधांचा धावता आढावा घेऊन, संस्थापक, वैद्यकीय सल्लागार आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्यात आला.
No comments:
Post a Comment