आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) तर्फे 'प्रॉब्लेम सॉल्वर'ची भावना साजरी करत, गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसाने सन्मानित
• आकाश विद्यार्थ्यांमध्ये ‘प्रॉब्लेम सॉल्विंग’ची कला विकसित करतो – जिच्या जोरावर विद्यार्थी कोणत्याही अडचणीत शांत, लक्ष केंद्रीत व उपायशोधक राहतात. यंदाच्या परीक्षांमधील बदलांनाही त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे गेले.
• आकाशियन विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की, जेव्हा ‘प्रॉब्लेम सॉल्विंग’ स्कील आत्मसात होते, तेव्हा कोणतीही परीक्षा यशस्वीरित्या पार करता येते.
मुंबई, ४ जुलै २०२५ (महासागर/ जागृत भानुशाली): भारतातील आघाडीची टेस्ट प्रिपरेशन संस्था, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत विद्यार्थ्यांना आव्हानांवर मात करून यशस्वी होण्यासाठी सक्षम केलं आहे. NEET UG 2025 आणि JEE Mains व Advanced 2025 या परीक्षांच्या स्वरूपात झालेल्या बदलांमुळे पेपर अधिक कठीण झाला असतानाही, आकाशच्या विद्यार्थ्यांनी देशभर आणि राज्यभरातून दमदार कामगिरी करत आपल्या संस्थेची गुणवत्ता अधोरेखित केली आहे.
NEET UG 2025 मध्ये आकाशच्या विद्यार्थ्यांनी टॉप 10 मध्ये तब्बल ५ रँक मिळवल्या — AIR 2, 3, 5, 9 आणि 10. टॉप 100 मध्ये एकूण ३५ विद्यार्थी आकाशचे असून, ११ राज्य टॉपर्स आकाशमधून घडले आहेत. हे टॉपर्स मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दादरा आणि नगर हवेली, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, गोवा आणि दमण-दीव या राज्यांतील आहेत.
JEE Advanced 2025 मध्येही आकाशच्या विद्यार्थ्यांनी आपली ताकद दाखवली असून, टॉप 100 मध्ये ७ आणि टॉप 200 मध्ये १४ विद्यार्थी स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. यामुळे मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोन्ही शाखांमध्ये AESL ची शैक्षणिक परंपरा अधिकच भक्कम झाली आहे.
"आकाशमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं कौशल्य शिकवतो," असं आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे एमडी आणि सीईओ दीपक मेहता म्हणाले. "म्हणूनच यंदाही आमच्याकडे इतके टॉप रँकर्स आहेत. NEET 2025 चं स्वरूप वेगळं तर होतंच, पण ते कठीणही होतं. पण नवं फॉर्मॅट असो किंवा नवी आव्हानं – आकाशियननी पुन्हा एकदा सिद्ध केलं की, जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग शिकता, तेव्हा कुठलाही टेस्ट crack करणं शक्य होतं."
नीट यूजी 2025 मध्ये मुंबईतील आकाश इन्स्टिट्यूटचे झळाळते यश!
नीट यूजी 2025 मध्ये आकाश इन्स्टिट्यूट, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी अफाट यश मिळवलं आहे. महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावणारा कृशांग जोशी (AIR 3) हा या यशाचा सर्वोत्तम दाखला आहे. त्याचबरोबर आरव अग्रवाल (AIR 10), इश्मीत कौर (AIR 85) आणि प्रखर मेहरोत्रा (AIR 195) यांनीही देशपातळीवर उत्कृष्ट रँक मिळवत आपली चमक दाखवून दिली.
इतर उल्लेखनीय गुणवंतांमध्ये अनिरुद्ध भूमा कन्नन (AIR 218), दक्ष पटेल (AIR 338), अपूर्वा प्रशांत कपाडे (AIR 382), अनन्या मेहता (AIR 427), मंथन जोशी (AIR 602) आणि अमितेश कुमार (AIR 752) यांचा समावेश आहे.
JEE Advanced 2025 मध्ये ‘आकाश’च्या टॉपर्सचा गौरव – निखिल AIR 986, यश शर्मा AIR 1050, अर्जुन शर्मा AIR 1989, लक्ष्य AIR 1661, आणि जायथी AIR 2088
‘आकाश’च्या विविध केंद्रांतील जेईई अॅडव्हान्स्ड 2025 टॉपर्सचा आज Champions of Aakash या विशेष कार्यक्रमात एईएसएल (AESL) तर्फे सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवून केवळ स्वतःचा गौरवच नाही तर आपल्या शहराचा आणि राज्याचा सुद्धा सन्मान वाढवला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये निखिल (AIR 986), यश शर्मा (AIR 1050), अर्जुन शर्मा (AIR 1989), लक्ष्य (AIR 1661), आणि जायथी (AIR 2088) यांचा समावेश आहे. त्यांच्या यशामागे योग्य दिशा, सक्षम मार्गदर्शन, आणि चिकाटीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
कार्यक्रमात बोलताना डॉ. एच. आर. राव, चीफ अकॅडमिक आणि बिझनेस हेड, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) यांनी सांगितले, "आमच्या विद्यार्थ्यांचे यश हे AESL साठी अत्यंत अभिमानाचे आणि प्रेरणादायी क्षण आहे. आकाशमध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला समस्यांचे समाधान शोधणारा, नव्या आव्हानांसमोर शांत आणि केंद्रित राहणारा, आणि नेहमी उपायकेंद्रित दृष्टिकोन ठेवणारा बनवण्यावर भर देतो – अगदी यंदाच्या परीक्षांमधील बदलांसारख्या अनपेक्षित गोष्टींच्या पार्श्वभूमीवरदेखील. आमचे सातत्यपूर्ण निकाल हे आमच्या मजबूत शैक्षणिक पायाभूत रचनेचे, वैयक्तिक मार्गदर्शनाचे आणि भविष्यासाठी सक्षम विद्यार्थी घडवण्याच्या आमच्या कटिबद्धतेचे प्रतिबिंब आहेत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे, विशेषतः यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, ज्यांनी आम्हाला अभिमान वाटावा असे यश मिळवून दिले."
टॉपर्सनी विद्यार्थ्यांना NEETसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक प्रभावीपणे कशी करता येईल, याबद्दल उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी वेळ व्यवस्थापन आणि तणावावर नियंत्रण ठेवण्याचे काही प्रभावी उपायही शेअर केले.
विद्यार्थ्यांना टॉपर्सच्या शैक्षणिक प्रवासाची थेट माहिती मिळाली, ज्यातून त्यांना प्रेरणा घेता आली. अभ्यासाच्या काळात वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, अडचणींवर मात कशी करावी, प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येतील आणि आकाश संस्थेच्या मदतीने आपल्या करिअरच्या उद्दिष्टांकडे कसे वाटचाल करता येईल – यावर सखोल चर्चा झाली.
या संवादात्मक सत्रात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या शंका समजून घेऊन त्यांचे समाधान करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपले अनेक प्रश्न स्पष्ट करता आले
No comments:
Post a Comment