• एसएमई कॉन्क्लेव्ह २०२५ मध्ये विकास धोरणे व एआय तंत्रज्ञानांची लघुउद्योगांच्या यशातील भूमिका सर्वांसमोर आणली तसेच एमएसएमईकडून अधिक दखल व पाठिंब्याची झाली मागणी
मुंबई, २५/02/२५ – आरएमबी न्युमेरो उनोद्वारे आयोजित एसएमई कॉन्क्लेव्ह २०२५ च्या निमित्ताने बिझनेस लीडर्स, धोरणकर्ते, आर्थिक तज्ज्ञ आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रवर्तक विकास धोरणे, वित्तीय पर्याय आणि मध्यम, लघु व सूक्ष्य उद्योग अर्थात एमएसएमईवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)च्या होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या एमएसएमईची दखल घेतली जाण्याची व त्यांना पाठिंबा देण्याची गरज या नोव्होटेल, मुंबई येथे पार पडलेल्या पुन्हा एकदा मुख्यत्वे मांडली गेली. एमएसएमई गटातील या उद्योगांचे भारताच्या जीडीपीमध्ये जवळ-जवळ ३० टक्के योगदान असूनही मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या व स्टार्टअप्सच्या तुलनेत ते बरेचदा दुर्लक्षित राहून जातात आणि म्हणूनच त्यांची अधिक प्रमाणात दखल घेतली जाण्याची व पाठबळ पुरविले जाण्याची गरज आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन एसबीआयच्या क्रेडिट रिव्ह्यू डिपार्टमेंट – एसएमई लोन्सचे जनरल मॅनेजर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सुनील विनायक झोडे यांच्या हस्ते करण्यात आले, ज्यांनी एमएसएमईना वित्तसहाय्य व पाठबळ पुरविण्याशी एसबीआयने जपलेल्या बांधिलकीची रूपरेखा सांगितली. रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चेतन देसाई यांनी एसएमईच्या वाढीला खतपाणी देण्यामध्ये बिझनेस नेटवर्क्सच्या भूमिकेला प्रकाशझोतात आणले.
अनेक मान्यवर वक्त्यांनी यावेळी आपले तज्ज्ञ विचार मांडले, ज्यात ग्रासिम इंडस्ट्रीजचे सीएफओ श्री. पवन जैन यांनी एसएमईची विकास धोरणे आणि या उद्योगांना कॉर्पोरेट भागीदारीसाठी पात्र कसे बनता येईल या विषयावर चर्चा केली, बीएसईचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. रजनीकांत पटेल यांनी एसएमईच्या वाढीसाठी आयपीओचा मार्ग आखण्याविषयी आपले अनमोल विचार मांडले, मोदी अँड अगरवालचे सीनिअर मॅनेजिंग पार्टनर सीए जी.बी. मोदी यांनी एमएसएमईना उपलब्ध असलेल्या सरकारी लाभ व अनुदान योजनांची तपशीलवार माहिती दिली तसेच ब्रह्म कुमारी बिझनेस अँड इंडस्ट्री विंगच्या व्हाइस चेअरपर्सन राजयोगिनी ब्रह्म कुमारी योगिनी दीदी यावेळी बोलल्या.
हेमंत जांगला (समन्वयक), राजेश शहा (अध्यक्ष), जेनिफर आयझॅक, सोनल दोशी, शिरीष गर्ग, सोम सैनी, नरेश गर्ग, अरुण वाधवा आणि आरएमबी न्यूमेरो उनोची लीडरशीप टीमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी दुसरे वार्षिक एसएमई कॉन्क्लेव्ह २०२५ यशस्वीपणे राबविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. हेमंत जांगला हे न्यूमेरो उनोचे संस्थापक असून एसएमई कॉन्क्लेव्ह हा त्यांच्या संकल्पनेतून साकारलेला उपक्रम आहे. त्याचबरोबर ते या उपक्रमाचे धोरणकर्ते व समन्वयकही आहेत.
यावेळी ब्लूक्रॉस लॅबोरेटीजचे व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र बर्वे यांनी “एसएमई-भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा” या विषयावर झालेल्या चर्चेचे नियामक म्हणून काम पाहिले. या परिसंवादात सहभागी झालेल्यांमध्ये अविनाशकर गोरक्षकर, सीए केतन दामजी साइया, एनएसआयसीचे वरीष्ठ शाखा प्रबंधक जे. कंठाराव आणि एसबीआयचे उपमहाव्यवस्थापक सुनिल कुमार अगरवाल या अग्रगण्य तज्ज्ञांचा या चर्चेमधून या परिषदेचा मुख्य संदेश पुन:स्थापित झाला: मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आणि स्टार्टअप्सचा गौरव होत असताना, आता एमएसएमईच्या महत्त्वपूर्ण योगदानाचीही दखल घेतली जाण्याची तसेच त्यांना त्यांच्या गुणवत्तेला अनुसरून आवश्यक ते पाठबळ पुरविण्याची वेळ आली आहे.
एसबीआय, एमओएसएल, आयडीएफसी, मेहेर एंटरप्राइझेस, श्यामक्रिस, व्हीपिनॅकल, ऑरिगा, ग्लोबल फायनान्शियल कन्सल्टन्ट्स यांच्यासह हॅवमोर इन्श्युरन्स ब्रोकर्स प्रा. लि. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
या कार्यक्रमाचे व्यवस्थापन अरुण वाधवा यांनी केले.
No comments:
Post a Comment