मुंबई, ९ ऑगस्ट, २०२४ (वार्ताहर): वर्ष १९७० मध्ये श्री. देशबंधू कागजी यांनी स्थापना केलेल्या श्रीजी ब्रँडने ब्लाऊज फॅब्रिक्समधील अग्रणी म्हणून सुरूवात केली, जो त्याच्या २x२ रूबियासाठी ओळखला जातो. नाविन्यता व दर्जाप्रती या कटिबद्धतेला त्यांचा मुलगा ब्रिजेंद्र कागजी यांनी अधिक चालना दिली. त्यांनी भारतभरात, तसेच यूके, ईयू, मिडल ईस्ट आणि लॅटिन अमेरिका अशा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कंपनीचे फूटप्रिंट वाढवले. श्रीजी लाइफस्टाइल ग्रुप शर्टिंग, महिलांचे पोशाख व लहान मुलांचे पोशाख यांमधील मान्यताकृत कंपनी बनली आहे, जी तिच्या मूल्यवर्धित आणि डिजिटली प्रिंटेड फॅब्रिक्ससाठी ओळखली जाते.
श्रीजी लाइफस्टाइल ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेंद्र कागजी ग्रुपला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत, तसेच कंपनीला त्यांचा थोरला मुलगा अभय कागजीचे नेतृत्व असलेल्या नवीन डायनॅमिक टीमचे पाठबळ असण्यासोबत त्यांचा धाकटा मुलगा कृशांग कागजीचा पाठिंबा आहे. ही नवीन पिढी श्रीजीच्या मुलभूत क्षमता आणि निष्ठावान ग्राहकवर्गाचा फायदा घेत कंपनीला नव्या उंचीवर घेऊन जात आहे, तसेच विकासाला गती देण्यासाठी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि अॅनालिटिक्स अशा आधुनिक साधनांचा वापर करत आहे.
जनरेशन झेड लीडरशीपने २०३० पर्यंत टेक्स्टाइल्समध्ये १२०० कोटी रूपयांची उलाढाल संपादित करण्यासाठी आराखडा तयार केला आहे, ज्यासाठी उत्पादन पोर्टफोलिओ विस्तारित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, तसेच भारतातील व परदेशातील कंपनीच्या स्थापित ब्रँड्सची पोहोच वाढवत आहेत. हे ब्रँड्स आहेत 'श्रीजी' - ब्लाऊज अँड फॅन्सी लेडीज वेअर फॅब्रिक्स, 'अवंत मोडा' - पुरूष व महिलांसाठी उच्चस्तरीय डिजिटल प्रिंटेड व पीस-डाय शर्टिंग व सूटिंग, 'क्रॅनबेरी' - क्रिएटिव्ह शर्टिंग व कुर्ता फॅब्रिक्स, 'गिझानी' - प्युअर गिझा यार्न-डाय व पीस-डाय फॅब्रिक्स आणि 'लिनेन व्हिला' - प्युअर लिनेन व नाविन्यपूर्ण लियोसेल लिनेन ब्लेण्ड्स.
''श्रीजी लाइफस्टाइल ग्रुप दर्जा, सातत्यता आणि विश्वसार्हतेसाठी ओळखला जातो,'' असे अभय कागजी म्हणाले. ''श्रीजीला फॅब्रिक उद्योगामध्ये, विशेषत: मोठ्या गारमेंट कंपन्या व आघाडीच्या फॅशन ब्रँड्ससाठी जागतिक लीडर म्हणून विकसित व स्थापित करण्यासाठी ही परिपूर्ण वेळ आहे. एआय आमच्या गतीशील विकासासाठी महत्त्वाचा स्रोत असेल, ज्यामुळे आम्हाला पुढील दशकामध्ये दोन-अंकी वाढीसाठी सज्ज असलेल्या विभागामध्ये प्रमुख कंपनी म्हणून श्रीजीचे स्थान प्रबळ करण्यास मदत होईल.''
अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा: info@shrijeelifestyle.com
No comments:
Post a Comment