Debadatta Chand, MD and CEO, Bank of Baroda (BoB)
मुंबई, 1 फेब्रुवारी, 2024 (Mahasagar): बँक ऑफ बडोदाने जाहीर केले Q3FY24 आर्थिक निकाल -
आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत बीओबीने केली 38.2 टक्के एवढ्या दमदार वाढीची नोंद, निव्वळ नफा 12,902 कोटी रुपयांवर
ठळक वैशिष्ट्ये
|
नफाक्षमता
- बीओबीने आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत 4,579 कोटी रुपये एवढ्या स्टॅण्डअलोन निव्वळ नफ्याची नोंद केली. आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत हा आकडा 3,853 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीतील निव्वळ नफा 12,902 कोटी रुपये (+38.2 YoY) होता. आर्थिक वर्ष 23च्या नऊमाहीत तो 9,334 कोटी रुपये होता.
- आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) मागील वर्षाच्या तुलनेत 2.6 टक्क्यांनी वाढून 11,101 कोटी रुपयांवर पोहोचले. आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीतील एनआयआयमध्ये 10.4 टक्के होऊन तो 32,929 कोटी रुपये झाला आहे.
- आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत व्याजेतर उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत 57.1 टक्क्यांनी वाढून 10,304 कोटी रुपये झाले आहे.
- जागतिक एनआयएमध्ये सलग सुधारणा होत आहे. आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत तो 3 बीपीएसने सुधारून 3.10 टक्के झाला आहे. आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीतील जागतिक एनआयएम 3.14 टक्के आहे.
- वित्तीय संस्थांना दिलेल्या आगाऊ रकमांवरील (अॅडव्हान्सेस) उत्पन्न आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत 8.51 टक्क्यांपर्यंत गेले आहे. आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत ते 7.78 टक्के होते.
- आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत ठेवींचा खर्च वाढून 4.96 टक्के झाला, आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तो 4.01 टक्के होता.
- आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत कार्यात्मक उत्पन्न 13,912 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीतील कार्यात्मक उत्पन्न 43,233 कोटी रुपये होते. त्यामध्ये 18.8 टक्के वाढ झाली.
- आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत कार्यात्मक नफा 7,015 कोटी रुपये होता. (आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत एमटीएमचा प्रभाव वगळता, तिमाही कार्यात्मक नफा 7,482 कोटी होता, तर आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत तो 7,307 कोटी रुपये होता.)
- आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत कार्यात्मक नफा 21.7 टक्क्यांनी वाढून 22,859 कोटी रुपये झाला.
- आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत उत्पन्न व खर्च ह्यांच्यातील गुणोत्तर 49.57 टक्के होते.
- आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत मालमत्तेवरील परतावा अर्थात आरओएमध्ये (वार्षिक) सुधारणा होऊन तो 1.20 टक्के झाला. आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत तो 1.13 टक्के होता.
- इक्विटीवरील परतावा आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत 19.91 टक्के होता. आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत, आरओईमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 168 बीपीएसने वाढ होऊन तो 18.70 टक्के झाला.
- एकत्रित घटक म्हणून, आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 4,789 कोटी रुपये होता, आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत हा आकडा 4,306 कोटी रुपये होता.
असेटचा दर्जा
- आर्थिक वर्ष 24 मध्ये एकूण एनपीए (बुडीतकर्जे) मागील वर्षाच्या तुलनेत 22.8 टक्क्यांनी घटून 32,318 कोटी रुपयांवर आला, तर एकूण एनपीए गुणोत्तर सुधारून 3.08 टक्के झाले, आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत ते 4.53 टक्के होते.
- बँकेचे निव्वळ एनपीए गुणोत्तर आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत अगदीच कमी म्हणजे 0.70 टक्का होते, आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत ते 0.99 टक्का होते.
- आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचे तरतूद संरक्षण गुणोत्तर अर्थात पीसीआर टीडब्ल्यूओसह 99.39 टक्के, तर टीडब्ल्यूओ वगळता 77.70 टक्के होते.
- आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत नवीन कर्जे बुडवले जाण्याचे प्रमाण (स्लिपेज रेशो) 1.06 टक्के होते, आर्थिक वर्ष 23च्या नऊमाहीत ते 1.22 टक्के होते. आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीतील स्लिपेज रेशो 0.95 टक्का म्हणजेच 1 टक्क्याहून कमी होता. आर्थिक वर्ष 23च्या तिसऱ्या तिमाहीत स्लिपेज रेशो 1.05 टक्के होता.
- पतखर्च, आर्थिक वर्ष 24च्या तिसऱ्या तिमाहीत 0.39 टक्का, तर आर्थिक वर्ष 24च्या नऊमाहीत 0.69 टक्का होता.
भांडवल पर्याप्तता
- बँकेचा सीआरएआर डिसेंबर’23 मध्ये 14.72 टक्के होता. डिसेंबर’23मधील आकडेवारीनुसार, श्रेणी-I 12.67 टक्क्यांवर, (सीईटी-1 11.11 टक्के, एटी1 1.56 टक्के) आणि श्रेणी-II 2.05 टक्के होता.
- एकत्रित कंपनीचे सीआरएआर आणि सीईटी-1 अनुक्रमे 15.14 टक्क्यांवर व 11.62 टक्क्यांवर होते.
- रोखता संरक्षण गुणोत्तर (एलसीआर) एकत्रित निकषावर 133 टक्के होते.
व्यवसायाची कामगिरी
- बँकेचे जागतिक अॅडव्हान्सेस मागील वर्षाच्या तुलनेत 13.6 टक्क्यांनी वाढून 10,49,327 कोटी रुपये झाले.
- बँकेचे देशांतर्गत अॅडव्हान्सेस मागील वर्षाच्या तुलनेत 13.4 टक्क्यांनी वाढून 8,62,086 कोटी रुपयांवर गेले.
- जागतिक ठेवी मागील वर्षाच्या तुलनेत 8.3 टक्क्यांनी वाढून 12,45,300 कोटी रुपयांवर गेल्या.
- डिसेंबर’23 मधील आकडेवारीनुसार, देशांतर्गत ठेवी मागील वर्षाच्या तुलनेत 6.3 टक्क्यांनी वाढून 10,67,371 कोटी रुपयांवर गेल्या.
- डिसेंबर’23 मधील आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय ठेवींमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 22.1 टक्क्यांनी वाढ होऊन त्या 1,77,929 कोटी रुपयांवर गेल्या.
- वाहनकर्ज (24.3%), गृहकर्ज (15.6%),व्यक्तिगत कर्ज (60.8%), तारणावरील (मॉर्गेज) कर्ज (10.5%), शैक्षणिक कर्ज (18.3%) ह्या महत्त्वपूर्ण विभागांतील वाढीच्या जोरावर ऑरगॅनिक रिटेल अॅडव्हान्सेसमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली.
- कृषीकर्जांचा पोर्टफोलिओ मागील वर्षाच्या तुलनेत 12.6 टक्क्यांनी वाढून 1,34,240 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
- सुवर्ण कर्जाचा एकूण पोर्टफोलिओ (रिटेल व कृषी कर्जांसह) 45,074 कोटी रुपयांवर पोहोचला असून, त्यात मागील वर्षाच्या तुलनेत 28.3 टक्के वाढ झाली आहे.
- ऑरगॅनिक एमएसएमई कर्जांचा पोर्टफोलिओ मागील वर्षाच्या तुलनेत 12.6 टक्क्यांनी वाढून 1,15,995 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
- कॉर्पोरेट अॅडव्हान्सेसमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 10.2 टक्के वाढ होऊन ते 3,62,813 कोटी रुपये झाले आहेत.
No comments:
Post a Comment