Tuesday, January 30, 2024

क्रॉम्‍प्‍टनला डेलॉइट इंडियाने सलग दुसऱ्या वर्षी इंडियाज बेस्‍ट मॅनेज्‍ड कंपनीज २०२३ म्‍हणून सन्‍मानित केले



मुंबई
३० जानेवारी २०२४ (Mahasagar): क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि.ला त्‍यांची सातत्‍यपूर्ण व्‍यवसाय कामगिरी आणि शाश्‍वत विकासासाठी डेलॉइट इंडियाने सलग दुसऱ्या वर्षी इंडियाज बेस्‍ट मॅनेज्‍ड कंपनीज २०२३ पुरस्‍कारासह सन्‍मानित केले आहे. इंडियाज 'बेस्‍ट मॅनेज्‍ड कंपनीजविजेत्‍यांमध्‍ये सर्वोत्तम इंडियन-ओन्‍ड व मॅनेज्‍ड कंपन्‍यांचा समावेश असतोज्‍या शाश्‍वत विकास संपादित करण्‍यासाठी धोरणक्षमता व नाविन्‍यतासंस्‍कृती व कटिबद्धता आणि आर्थिक क्षेत्रात नेतृत्‍व दाखवतात. 

कंपनीच्‍या अलिकडील कामगिरीबाबत मत व्‍यक्‍त करत क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रोमीत घोष म्‍हणाले, ''आम्‍हाला पुन्‍हा एकदा डेलॉइट प्रायव्‍हेटद्वारे इंडियाज बेस्‍ट मॅनेज्‍ड कंपनीज म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात येण्‍याचा अभिमान वाटतो. नाविन्‍यतेच्‍या संस्‍कृतीमध्‍ये रूजलेली क्रॉम्‍प्‍टन नेहमी दर्जेदार सर्वोत्तमतेसंदर्भात अग्रस्‍थानी राहिली आहेजे नाविन्‍यपूर्ण व शाश्‍वत सोल्‍यूशन्‍सच्‍या आमच्‍या श्रेणीमधून दिसून येते. तसेचआमच्‍या ५-आयामी विकास धोरणाने आम्हाला दीर्घकालीन मूल्‍य निर्माण करण्‍यासाठी आमची संसाधने व संबंधांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास देखील मदत केली आहे. पणएकूण या मान्‍यतेमधून क्रॉम्‍प्‍टनमधील आमच्‍या समर्पित टीमचे सहयोगात्‍मक प्रयत्‍न दिसून येतात. या टीमच्‍या सर्वोत्तमतेप्रती कटिबद्धतेने आम्‍हाला नव्‍या उंचीवर नेले आहे आणि पुढे देखील नेत राहिल. आमचा दृढ विश्‍वास आहे कीप्रेरित व सक्षम टीम आमच्‍या यशामागील प्रेरक शक्‍ती आहे आणि आम्‍ही आमच्‍या कंपनीच्‍या शाश्‍वत विकासाच्‍या खात्रीसाठी आमच्‍या कर्मचाऱ्यांप्रती गुंतवणूक करत राहू.'' 

No comments:

Post a Comment