![]() |
Left Side- Shri J. Venkatramu, MD & CEO, IPPB and Shri Sivasubramanian Ramann, CMD, SIDBI signs MoU for development of informal micro entrprises. |
मुंबई, 13 ऑक्टोबर 2023 (Mahasagar News): इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) यांनी एमएसएमई विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात असलेल्या उद्योगांना औपचारिक वित्तीय सेवा आणि इतर समर्थन सेवांच्या विस्तारास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने धोरणात्मक भागीदारी केली आहे.
श्री शिवसुब्रमण्यम रमण, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,(CMD)-सिडबी आणि श्री जे वेंकटरामू, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयपीपीबी तसेच श्री विवेक जोशी, सचिव, वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार आणि श्रीमती वंदिता कौल, सदस्य (बँकिंग आणि डीबीटी), पोस्टल सेवा मंडळ, पोस्ट विभाग, भारत सरकार. यांच्या मान्यवर उपस्थितीत 11 ऑक्टोबर 2023 रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या भागीदारीचा उद्देश सिडबीच्या क्रेडिट आणि क्रेडिट जोखीम मूल्यमापन मॉडेलचा लाभ उठवणे तसेच विद्यमान नियमांनुसार आयपीपीबी ची ग्रामीण पोहोच वाढवणे आणि ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनौपचारिक आणि सूक्ष्म उद्योगांपर्यंत पोहोचणे आणि गावपातळीवरील समुदायांशी सखोल संबंध ठेवणे हा आहे.
आयपीपीबी हे सिडबीच्या ग्राहकांना त्याच्या व्यापारी ऑनबोर्डिंग प्रणालीद्वारे आणि यूपीआय,क्यू आर आधारित सोल्यूशन्स इत्यादी सारख्या विविध उपायांद्वारे पेमेंट प्रक्रियेचे डिजिटायझेशन करण्यात मदत करेल.
दोन्ही संस्था लघुउद्योगांना कर्ज आणि इतर सेवांमध्ये मदत देण्यासाठी डाक सेवकांच्या कौशल्य-उन्नतीसाठी संयुक्त कार्यक्रमही राबवतील. तसेच ते संयुक्तपणे परस्पर हिताची इतर क्षेत्रे ओळखण्यासाठी कार्य करतील आणि अनौपचारिक सूक्ष्म उपक्रमांवर विशेष लक्ष केंद्रित करून देशभरातील एमएसएमई आणि एमएसएमई इकोसिस्टमला पाठिंबा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतील.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याबरोबरच, ग्रामीण भागातील वित्तीय सेवांमध्ये नवकल्पना आणण्यासाठी आणि ग्रामीण उपजीविका उपक्रमांना चालना देण्यासाठी स्वावलंबन चॅलेंज फंड तयार करण्यासाठी फिनटेक समुदायाचा समावेश असलेल्या हॅकाथॉनचे आयोजन करण्याची घोषणाही करण्यात आली.
यावेळी बोलताना, सचिव, डीएफएस यांनी देशातील विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागात अनौपचारिक आणि सूक्ष्म उद्योगांना लक्ष्य करून आर्थिक समावेशन प्रगत करण्याच्या दिशेने सिडबी आणि आयपीपीबी यांच्यातील प्रस्तावित भागीदारीच्या भविष्यातील संभावनांवर प्रकाश टाकला.
श्री शिवसुब्रमण्यम रमण म्हणाले, "आम्ही आयपीपीबी सोबत फलदायी आणि अर्थपूर्ण भागीदारीची अपेक्षा करत आहोत, जी देशातील लाखो अनौपचारिक ग्रामीण उपक्रमांना आर्थिक सेवा आणि आर्थिक साक्षरतेपर्यंत पोहोचवून त्यांचा सकारात्मक परिणाम करू शकते.
श्री जे वेंकटरामू, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आयपीपीबी यांनी आर्थिक समावेशन उपक्रमांना बळकट करण्याची संस्थात्मक इच्छा व्यक्त केली. देशातील एमएसएमईसाठी आघाडीच्या वित्तीय संस्थेसोबत यशस्वी भागीदारीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
No comments:
Post a Comment