Wednesday, October 11, 2023

बँक ऑफ बडोदा’च्या वतीने रिटेल टर्म डिपॉझीटवरील व्याज दरांत सुधारणा


मुंबई,
 11 ऑक्टोबर, 2023 (Mahasagar News): बँक ऑफ बडोदा (बँक), ही भारताची सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक असून आज त्यांच्या वतीने डोमॅस्टीक रिटेल टर्म डिपॉझीटसह एनआरओ आणि एनआरई टर्म डिपॉझीटवरील व्याज दरांत वृद्धीची घोषणा तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 50 बेसिस पॉइंटपर्यंत करण्यात आली. हे दर दिनांक 09 ऑक्टोबर 2023 पासून रू. 2 कोटींहून कमी जमा रकमेवर लागू असतील.    

बँकेच्या वतीने सामान्य नागरिकांसाठी 7.40% वार्षिक तर ज्येष्ठ नागरिकांकरिता 7.90% वार्षिक याप्रमाणे व्याजदर देण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% वार्षिक अतिरिक्त व्याज आणि नॉन-कॉलेबल ठेवींसाठी 0.15% याप्रमाणे व्याज दर राहतील. बँकेच्या वतीने तिरंगा प्लस ठेव योजनेवर 399 दिवसांसाठी व्याजदरांची रचना नव्याने केली. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना नॉन-कॉलेबल ठेवींवर 7.80% व्याज दर कमावता येईल.   

बँक ऑफ बडोदा’चे रिटेल लायबिलिटीज आणि एनआरआय व्यवसाय, मुख्य महाव्यवस्थापक श्री. रवींद्र सिंग नेगी म्हणाले, “ग्राहकांना आकर्षक व्याजदराचा प्रस्ताव देताना आम्हाला आनंद होत आहे. ज्यामुळे त्यांना अधिक खात्रीशीर परतावा मिळू शकेल. 2 ते 3 वर्षांच्या गुंतवणूक कालावधीत, ज्येष्ठ नागरिक ठेवीदार आता 7.90% वार्षिक याप्रमाणे कमाई करू शकतात, हे दर बैंकिंग उद्योगातील सर्वोत्तम मानले जातात. विद्यमान आणि नवीन ग्राहकांना भारतातील आघाडीच्या बँकेत नवीन ठेवी ठेवण्याची आणि त्यांच्या ठेवींवर उच्च व्याजदर प्राप्त करण्याची ही योग्य वेळ आहे.”

बँक ऑफ बडोदाने आपली उत्सवी मोहीम “बीओबी के संग त्योहार की उमंग” ची पण सुरुवात केली असून बॉब लाइट बचत खाते, बॉब बीआरओ बचत खाते, माय फॅमिली माय बँक/बीओबी परिवार खाते, बडोदा एनआरआय पॉवरपॅक यासारख्या नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. खाते आणि BOB SDP (सिस्टमॅटिक डिपॉझिट प्लॅन), विविध ग्राहक विभागांना अनेक फायदे प्रदान करतात. उत्सवाची मोहीम 31 डिसेंबर 2023 पर्यंत चालणार असून बँकेला ग्राहकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लाभतो आहे. वरील योजनांसह, ग्राहक आता त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज मिळवू शकतात.

बँक ऑफ बडोदाने यापूर्वी मे 2023 आणि मार्च 2023 मध्ये किरकोळ मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली होती.

बँक ऑफ बडोदाचे विद्यमान आणि नवीन ग्राहक या ऑफरचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या भारतभरातील कोणत्याही शाखेतून नवीन एफडी सुरू करून घेऊ शकतील. सध्याचे ग्राहक बँकेच्या मोबाईल अॅप (बॉब वर्ल्ड)/ नेट बँकिंग (बॉब वर्ल्ड इंटरनेट) द्वारे ऑनलाइन एफडी सुरू करू शकतात.


No comments:

Post a Comment