Wednesday, December 11, 2024

करूर वैश्य बँकेच्या ४ नवीन शाखांचे उद्घाटन संपन्न



• बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्रात २५ शाखा आहे.

मुंबई, ११ डिसेंबर २०२४ (Mahasagar): करूर वैश्य बँकेने (KVB – केव्हीबी) आज तामिळनाडूमध्ये आपल्या चार नवीन शाखांचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. या शाखा खाती, ठेवी आणि कर्ज यासारख्या बँकिंग सेवा इत्यादींसह बचत व चालू खाती आणि लॉकर सुविधा अशा विस्तृत श्रेणीच्या सेवा सुविधा आपल्या ग्राहकांना देवू करतील.

सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात बँकेने नवीन २४ शाखांची सुरुवात केली असून आतापर्यंत बँकेच्या एकूण ८६२ शाखा झालेल्या आहेत.

आज उघडलेल्या नवीन शाखा (त्यांचा क्रमांक, शहराचे नाव, उद्घाटक यासह) पुढीलप्रमाणे :

१. ८५९ वी शाखा - मदुराई (ओठाकडई) - श्रीमती एन. उषा सहआयुक्त (वाणिज्यिक कर), इंटेलिजन्स, मदुराई यांच्या हस्ते उद्घाटन.

२. ८६० वी शाखा - तिरुपूर (मुथूर) - श्री. एम.एस. षणमुगम, प्रतिनिधी, विवेकानंद शैक्षणिक संस्था, मुथूर यांच्या हस्ते उद्घाटन.

३. ८६१ वी शाखा - कृष्णगिरी (गांधी रोड) - श्रीमती ए. आफताब बेगम,

सचिव, जिल्हा पंचायत कार्यालय, कृष्णगिरी यांच्या हस्ते उद्घाटन.

४. ८६२ वी शाखा - चेन्नई (कोलाथूर) - श्री हनिश चाबरा, (आय.ए.एस.), व्यवस्थापकीय संचालक, न्यू तिरुपूर क्षेत्र विकास निगम मर्यादित, चेन्नई यांच्या हस्ते उद्घाटन.

नवीन शाखा या किरकोळ, संस्थात्मक आणि ग्राहक कर्ज यासह बँकिंग उत्पादने आणि वित्तीय सेवांचा संपूर्ण सुविधापट उलगडून सर्व मूलभूत बँकिंग व्यवहार आणि ग्राहकांच्या विशिष्ट गरजा यांची पूर्तता करतील,

करूर वैश्य बँक (KVB – केव्हीबी) इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा देते. केव्हीबी  डिलाईट (KVB DLite), हे बँकेचे मोबाइल बँकिंग ॲप १५० हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक आणि गैर-आर्थिक सेवांची सुविधा प्रदान करते. नुकतेच हे ॲप अनेक ग्राहक उपयोगी वैशिष्ट्यांसह अद्ययावत करण्यात आलेले आहे.

करूर वैश्य बँकेविषयी:

करूर वैश्य बँकेकडे ८६२ शाखा आणि २२०० हून अधिक एटीएम आणि रोखपुनर्वापरच्या स्वरूपात ग्राहकांसाठीची सेवा-सुविधा केंद्रे आहेत. बँक तिच्या मजबूत आर्थिक स्थितीसह प्रगतीपथावर आहे. दिनांक ३०-०९-२०२४ नुसार, बँकेचा एकूण व्यवसाय हा मूळ ठेवीं ९५ हजार ८३९ कोटी रुपये आणि आगाऊ रक्कम ८० हजार २९९ कोटी रुपयेसह एकूण १ लक्ष ७६ हजार १३८ कोटी रुपये एवढा आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने आतापर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा १ हजार ६०५ कोटी रुपये कमावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच बँकेने निव्वळ नफा म्हणून ९३२ कोटी रुपये मिळविला आहे. बँकेचा एनपीए (NPA) हा ०. २८ % होता.

No comments:

Post a Comment