मुंबई, 21 जून, 2024 (महासागर)- ईकेए (पिनॅकल मोबिलिटी सोल्यूशन्स)ने घोषणा केली की, औद्योगिक नाविन्यतेप्रती योगदानाचा संपन्न इतिहास असलेली जागतिक ट्रेडिंग व गुंतवणूक कंपनी मित्सुई अँड कं. लि. (''मित्सुई'') ने सुरूवातीला घोषणा केलेल्या टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा भाग म्हणून दुसऱ्या टप्प्यातील गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे झपाट्याने विकसित होत असलेल्या इलेक्ट्रिक वेईकल (ईव्ही) कंपनीप्रती त्यांची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. ही धोरणात्मक गुंतवणूक भांडवल खर्च (कॅपेक्स) आणि खेळत्या भांडवलासाठी वापरण्यात येईल, ज्यामुळे ईकेए मोबिलिटीच्या ईव्ही क्षेत्रातील सातत्यपूर्ण विस्तारीकरण व नाविन्यतेला पाठिंबा मिळेल. हा टप्पा कंपनीसाठी लक्षवेधक मूल्यांकन बेंचमार्क स्थापित करतो, ज्यामधून ईकेए झपाट्याने करत असलेली वाढ दिसून येते.
डिसेंबर २०२३ मध्ये ईकेए, मित्सुई आणि व्हीडीएल ग्रुप यांनी धोरणात्मक दीर्घकालीन सहयोग केला, ज्यामध्ये भारतात आघाडीची जागतिक ओईएम निर्माण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची (जवळपास ८५० कोटी रूपये) संयुक्त गुंतवणूक, इक्विटी आणि तंत्रज्ञान सहकार्याचा समावेश होता. हा जागतिक स्तरावरील नवीन मोबिलिटी विभागातील सर्वात मोठा व सर्वात महत्त्वपूर्ण सहयोग आहे. या सहयोगांतर्गत ईकेए मोबिलिटीला मित्सुईकडून मोठ्या प्रमाणात धोरणात्मक गुंतवणूका मिळतील, तसेच आघाडीची डच तंत्रज्ञान व उत्पादन कंपनी व्हीडीएल ग्रुपकडून तंत्रज्ञान साह्य व इक्विटी सहयोग मिळेल. या सहयोगाचा भाग म्हणून व्हीडीएल ग्रुपची उपकंपनी आणि युरोपमधील इलेक्ट्रिक बसेस् व कोचेसमधील अग्रगण्य कंपनी व्हीडीएल बस अँड कोच ईकेए मोबिलिटीला तंत्रज्ञान हस्तांतरित करत भारतातील बाजारपेठेसाठी भारतात इलेक्ट्रिक बसेस् उत्पादित करण्यास साह्य करेल.
या वर्षाच्या सुरूवातीला मित्सुईने ईकेएमध्ये पहिल्या टप्प्यात गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीला देशामध्ये इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्स, नवीन उत्पादन विकासासाठी सर्वात मोठे आरअँडडी केंद्र स्थापित करता आले, तसेच कंपनी आपली निर्यात उपस्थिती देखील वाढवत आहे. दुसऱ्या टप्प्यातील गुंतवणूक ईकेए मोबिलिटीच्या उत्पादन क्षमतांना साह्य करेल, नवीन उत्पादन विकासाला गती देईल, बाजारपेठ पोहोच वाढवेल आणि खेळते भांडवल प्रदान करेल. ही गुंतवणूक दैनंदिन कार्यसंचालने, सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन आणि बाजारपेठ विस्तारीकरण उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी कंपनीचा आर्थिक पाया भक्कम करेल.
''आम्हाला या दुसऱ्या टप्प्यातील गुंतवणूकीच्या माध्यमातून ईकेए मोबिलिटीसोबत आमचा सहयोग दृढ करण्याचा आनंद होत आहे,'' असे मित्सुईच्या मोबिलिटी बिझनेस युनिट १ चे उप डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. हिरोशी ताकेची म्हणाले. ''ईकेए मोबिलिटीने ईव्ही क्षेत्रात प्रबळ वाढ व नाविन्यता दाखवली आहे आणि आम्हाला त्यांच्या सातत्यपूर्ण यशाला पाठिंबा देण्याचा आनंद होत आहे. आम्ही मित्सुईच्या जागतिक नेटवर्कचा फायदा घेत ईकेएच्या स्पर्धात्मक उत्पादनांच्या परदेशी बाजारपेठांमधील निर्यातीला गती देण्यास उत्सुक आहोत. ही गुंतवणूक मित्सुईच्या शाश्वत व भविष्यकालीन उद्योगांवरील धोरणात्मक फोकसशी संलग्न आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ईकेए मोबिलिटी भावी परिवहनासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावेल.''
भारतातील पुणे येथे मुख्यालय असलेली ईकेए व्यावसायिक इलेक्ट्रिक मोबिलिटी क्रांतीमध्ये अग्रस्थानी आहे, तसेच ७ मीटर, ९ मीटर व १२ मीटर कॅटेगरीजमध्ये इलेक्ट्रिक बसेस, इंटरसिटी कोचेसची श्रेणी आणि इलेक्ट्रिक लाइट कमर्शियल वेईकल्सची श्रेणी विकसित करत आहे. ईकेए भारत सरकारच्या ऑटो पीएलआय धोरणांतर्गत मान्यता असलेल्या कमर्शियल वेईकल उत्पादकांपैकी देखील एक आहे. मित्सुईच्या नवीन गुंतवणूकीमधून ईकेए मोबिलिटीचा दृष्टिकोन, तंत्रज्ञान व बाजारपेठ क्षमतेमधील तिचा आत्मविश्वास दिसून येतो.
ईकेए (पिनॅकल मोबिलिटी सोल्यूशन्स)चे संस्थापक डॉ. सुधीर मेहता यांनी मित्सुईचे सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी आभार व्यक्त केले. ते म्हणाले, ''आम्ही ईकेए मोबिलिटीमध्ये अविरत आत्मविश्वास दाखवण्यासोबत शाश्वत गुंतवणूक करण्यासाठी मित्सुई आणि व्हीडीएल ग्रुपचे आभार व्यक्त करतो. हा सातत्यपूर्ण गुंतवणूक पाठिंबा आम्हाला आमच्या विकासाला गती देण्यास, बाजारपेठेत झपाट्याने नाविन्यपूर्ण ईव्ही सोल्यूशन्स आणण्यास आणि शाश्वत व हरित परिवहन इकोसिस्टम निर्माण करण्याप्रती आमचे मिशन दृढ करण्यास सक्षम करेल. आम्ही मित्सुई आणि व्हीडीएलसोबत दीर्घकालीन व यशस्वी सहयोगासाठी उत्सुक आहोत.''
कंपनीचा ऑर्डर बुक १००० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस् आणि ५००० हून अधिक इलेक्ट्रिक लाइट कमर्शियल वेईकल्सपर्यंत वाढला आहे. दिल्ली व बृहन्मुंबईमध्ये ईकेए बसेसना मिळालेला व्यापक प्रतिसाद पाहता पुढील काही महिन्यांत इलेक्ट्रिक बस ऑर्डर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि कंपनी त्याची पूर्तता करण्यासाठी उत्तमरित्या स्थित आहे.
================================================
No comments:
Post a Comment