Tuesday, April 30, 2024

महाराष्ट्र दिनी काळबादेवी येथे डॉ. शैलेंद्र सरस्वती (ओशोंचे अनुज) यांचे मेडिटेशन आणि व्याख्यान

फोटोलाइन: डावीकडून उजवीकडे, शिखरचंद जैन, हिंदुस्थान चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि FICCI च्या कार्यकारी समितीचे सदस्य, स्वामी शैलेंद्र सरस्वती, ओशोंचे अनुज (लहान भाऊ) आणि ओशोंचे अनुयायी देवकीनंदन


महाराष्ट्र दिनी काळबादेवी येथे ओशो कार्यक्रम 

ओशो मेडिटेशन आणि व्याख्यान डॉ. शैलेंद्र सरस्वती (ओशोंचे अनुज) आणि मा अमृत प्रिया यांच्या उपस्थिती पार पडले 

मुंबई, ३० एप्रिल २०२४ (Mahasagar): हिंदुस्तान चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि फिक्कीचे कार्यकारी समिती सदस्य शिखरचंद जैन आणि मे. ऋषी एंटरप्रायझेस, मुंबई यांनी १ मे २०२४ रोजी सकाळी त्यांच्या नव्याने विकसित झालेल्या ‘सोजत स्वर्ण’ इमारतीच्या उद्घाटनाचे आयोजन केले आहे. हे उद्घाटन डॉ. स्वामी शैलेंद्र सरस्वती (ओशो यांचे लहान बंधू) आणि माँ अमृत प्रिया यांच्या हस्ते केले जाईल. या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि न्यायाधीश के. के. ताथेड हे असतील. 

स्वामी शैलेंद्र सरस्वती आणि माँ अमृता प्रिया यांचा सोनीपत येथे ६ एकरांचा आश्रम आहे. ते उद्घाटनाच्या वेळी मटेरियलिझम आणि आध्यात्मिकता या विषयावर प्रवचन करतील. सोजत स्वर्ण भवनच्या काळबादेवी येथील १ मे रोजी असलेल्या उद्घाटनाच्या वेळी ओशो मेडिटेशन, प्रवचन आणि प्रश्नोत्तरे या सर्व गोष्टी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान होतील. 

शिखरचंद जैन हे राजस्थानमधील सोजत येथे २८ एकरांमध्ये २० कोटी रूपयांचे ओशो ध्यान केंद्र उभारणार आहेत. हे बांधकाम १ लाख चौरस फुटांवर केले जाईल. हा आश्रम १८ महिन्यांत तयार होण्याची अपेक्षा आहे. 

ओशो मेडिटेशन आणि उत्सवाशी संबंधित माहिती: 

सद्गुरू ओशो यांच्या मते पूर्व आणि पश्चिम म्हणजे भौतिक कार्ये आणि अध्यात्म यांची सांगड घालणे आवश्यक आहे. गौतम बुद्ध आत्मा, शांती, प्रेम आणि करूणा या गोष्टी एकत्र आणतात, ग्रीक झोर्बा वस्तूवाद आणि ऐशाराम यांची सांगड घालतात. सद्गुरू ओशो ज्ञान आणि विज्ञानाचे संतुलन, पूर्व आणि पश्चिम यांना एकत्र आणण्यावर विश्वास ठेवतात. ते मनःशांती, प्रेम, प्रत्यक्ष यश, सुलभता या सर्व गोष्टींना भौतिक यश आणि आरोग्य या गोष्टींना एकत्र आणण्याचा परिणाम असल्याचे मानतात. ते याला ‘झोर्बा दि बुद्धा’ असे म्हणतात.

मेडिटेशन आणि विज्ञान या गोष्टी एकत्र आणणे महत्त्वाचे आहे. बाह्य शक्ती आणि अंतर्गत मनःशांती या जगाला संकटापासून वाचवण्यासाठी आवश्यक आहे. शांत लोक कमकुवत होणे जितके घातक आहे तितकेच विघातक लोक शक्तिशाली होणे घातक आहे. 


No comments:

Post a Comment