Monday, April 22, 2024

राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धडाका कायम : माणगावच्या माजी सरपंचांसहित बेकरेवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत प्रवेश





मुंबई
, २२ एप्रिल २०२४ (Mahasagar):  दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेश आणि पदनियुक्तांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात माणगावच्या माजी सरपंच सौ.कल्पना जैतु पारधी यांच्यासहीत बेकरेबाडीतील अनेक ग्रामस्थांनी प्रवेश केला. तसेच नेरळ शहरातील मोहाचीवाडी, पायरमल आणि वाल्मिकीनगर येथिल नागरिकांचाही पक्षप्रवेश झाला. 

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या ग्रामस्थांमध्ये सौ. कल्पना जैतु पारधी मा. सरपंच माणगाव तर्फे वरेडी श्री.नामदेव भागा निरगुडे, आलो भागा निरगुडे, बुधाजी आलो निरगुडे, गजानन गोमा पारधी, कैलास पालु निरगुडे,  किसन पालु निरगुडे, पालु बाळु निरगुडे,  बुधाजी नारायन पारधी, रमेश बुधाजी पारधी, हेमंत धाऊ पारधी, सचिन हेमंत पारधी, किसन हेमंत पारधी, दत्ता मंगळा पारधी,  गोविंद आलो पारधी, वाळकु सखाराम पारधी, राजेश नामदेव निरगुडे, अर्जुन जानु निरगुडे, सुरेश जानु निरगुडे, मंगेश सुरेश निरगुडे,  रुपेश अर्जुन निरगुडे, विवेक अशोक निरगुडे, मयुर बुधाजी निरगुडे, विकास लक्ष्मन दरवडा, मंगला नागो पारधी, नितीन बुधाजी पारधी, यूरावंत लक्ष्मन निरगुडे, जयेंद्र नामदेव निरगुडे, नितीन जैतु पारधी, राम पांडू सांबरी इत्यादी नागरिकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच सौ. सुनिता नामदेव निरगुडे, मंगळी पालु निरगुडे, बनीबाई आलो निरगुडे, शारदा चंद्रकांत निरगुडे, सोनी अशोक निरगुडे, धवळी लक्ष्मण दरवडे, अनिता अर्जुन निरगुडे, सरिता सुरेश निरगुडे, चांगुणा महादु पारधी, ताई बुधाजी निरगुडे, मंजुळा कैलास निरगुडे, वनिता हेमंत पारधी, गीता बुधाजी पारधी, धाईबाई गोमा पारधी, रंजना गजानन पारधी, संगिता पारधी, सविता गोविंद पारधी, कविता राम सांबरी, रेवती संजय पुजारी, संगीता यशवंत निरगुडे, मनिष मधु पुंजारी, प्रकाश महादु पारधी, मच्छिंद्र गोविंद पारधी, विकास लक्ष्मण दरवडा, जयवंत मंगल पुंजारी, नाथा चंद्रकांत निरगुडे, नितिन बुधाजी पारधी, राजेश नामदेव निरगुडे, दिनेश सुरेश निरगुडे, बाळु लक्ष्मण पारधी, वैभव द्त्ता घरत, जगदीश डोबरे इत्यादी नागरिकांचा सहभाग होता.

जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापुजनाने करण्यात आली. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन केले. तसेच वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. माननीय सुधाकर भाऊ घारे यांनी बोलताना बाबासाहेबांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्यामुळे आज प्रत्येकाला जगण्याचा हक्क प्राप्त झाला असे प्रतिपादन केले.

सुधाकर घारेंनी केले युवा मंचाच्या कामाचे कौतुक : अक्षय जाधवच्या कामाची घेतली दखल

रविवारी पक्षप्रवेशासोबतच पदनियुक्तांचाही कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना कर्जत खालापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते माननीय सुधाकर भाऊ घारे यांनी सुधाकर घारे युवा मंचाच्या कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेत अक्षय जाधव याच्या कामाचे कौतुक केले. आज युवा मंचाच्या माध्यमातून प्रत्येक गावात आपल्या तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात आपल्याला यश आले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगीतले. दरम्यान यावेळी युवा मंचाच्या अनेक सदस्यांच्या पदनियुक्त्या करण्यात आल्या.

सौ.मनिषा शरद ठोंबरे यांची राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड

दरम्यान संघटन बांधणी करताना काही महत्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये मा. सौ. मनिषा शरद ठोंबरे यांची राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस कर्जत शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाला आणखी ताकद मिळेल असे मत सुधाकर भाऊ घारे यांनी व्यक्त केले.

मुस्लिम बांधवांकडून सुधाकर भाऊंवर प्रेमाचा वर्षाव

पक्षप्रवेशाचा सोहळा जनसंपर्क कार्यालयात पार पडत होता. अशात मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर आलेल्या सरपंच सरफराज टिवाले यांनी आपण भाषण करण्यासाठी नाही तर मुस्लिम बांधवांकडून भाऊंचे आभार मानन्यासाठी उभा असल्याचे सांगीतले. ते म्हणाले की, "सुधाकर भाऊंनी आम्हा मुस्लिम बांधवांना दिलेली रमजान ईदची भेट आम्हा सर्वांना मनापासुन आवडली. दरवर्षी भाऊ ही भेट देतच असतात. यापर्षी भाऊंनी पवित्र कुराणातील शांततेचा संदेश त्यामध्ये पाठवला होता. याबद्द्ल आम्ही सर्व बांधव आपले आभारी आहोत." दरम्यान याचवेळी अमीर मनियार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मला पंचवीस वर्षात पहिल्यांदा  व्यासपिठावर बोलण्याची संधी मिळाली असे त्यांनी सांगीतले. तसेच सुधाकर भाऊंनी दिलेल्या रमजान भेटच्या कार्याचे त्यांनी मनापासुन कौतुक केले.

नेरळ शहरातही वाढत आहे राष्ट्रवादीची ताकद : सुधाकर घारे सातत्याने मांडत आहेत नेरळकरांचे प्रश्न

दरम्यान मागील काही काळापासुन माननीय सुधाकर भाऊ घारे यांच्या माध्यमातून नेरळच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवला जात आहे. तसेच नेरळ शहरातील अनेक प्रवेशही होताना दिसत आहेत. या रविवारी देखील नेरळमधील अनेकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्याचे पहायला मिळाले. यामध्ये नेरळ शहरातील पायरमल, मोहाचीवाडी आणि वाल्मिकीनगर येथिल नागरिकांचा पक्षप्रवेश झाला. यामध्ये  नरेश पवार- मा. ग्रामपंचायत सदस्य नेरळ, प्रकाश वाघ - मा. ग्रामपंचायत सदस्य नेरळ, गोरख शेप - उपाध्यक्ष वाहतुक शाखा, विनायक बिडकर, तुषार बडेकर, संदिप शर्मा, गणेश कोकाटे, गणेश मोरे, कुणाल घोटेकर, बबन जाधव, गुणवंत पवार, नागेश पवार, भावश चव्हाण, प्रसाद लोभी, गणपत वाघमारे, नागेश वाघमारे, राहुल बागुल, प्रविण वाघ, साहिल सहेद, गोटिराम पुजारी, सुनिल चव्हाण इत्यादी नागरिकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment