राष्ट्रीय, 07 मार्च 2024 (महासागर): आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, अमृतांजन, हेल्थकेअर लिमिटेड #PowerToBeYou या आपल्या मोहिमेद्वारे महिला आणि मुलींचे सक्षमीकरण करण्याच्या आपल्या बांधिलकीची पुष्टी करत आहे. वेगाने वाढणारा मासिक पाळी दरम्यानचा आरोग्यविषयक ब्रँड अमृतांजनच्या कॉम्फीने ही मोहीम सुरू केली. भारतातील मासिक पाळी विषयक गंभीर समस्येचे निराकरण या मोहिमेतून करण्यात येत असून प्रत्येक स्त्रीला तिच्या मासिक पाळीच्या काळाचे सन्मानाने आणि आत्मविश्वासाने व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे या संदेशाचा प्रसार करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
#PowerToBeYou चे उद्दिष्ट महिलांना परवडणारी आणि उच्च दर्जाची मासिक पाळी स्वच्छता उत्पादने मिळवून त्यांचे सक्षमीकरण करून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे आहे. शिक्षण जागरुकता वाढवून आणि अत्यावश्यक उत्पादने उपलब्ध करून देत अमृतांजनच्या कॉम्फी सर्व महिलांसाठी एक निरोगी आणि अधिक न्याय्य, समान भविष्य निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
वर्षानुवर्षे, अमृतांजन कॉम्फी भारतातील मासिक पाळी विषयक गंभीर समस्येचे निराकरण करण्यात आघाडीवर आहे. आपल्या दिशा या प्रकल्पांतर्गत कंपनी या वर्षी १० राज्ये, ९०० शहरे, ४०० शाळा, ४.८ लाख विद्यार्थी आणि १०० अंगणवाडी केंद्रांपर्यंत मासिक पाळीच्या वेळी ठेवायची स्वच्छता याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि मासिक पाळीच्या अत्यावश्यक स्वच्छता उत्पादनांच्या उपलब्धी मध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी पोहोचली आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून, कॉम्फीने अलिकडेच पीरियड पेन रिलीफ उपक्रमाद्वारे महिला पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या पीरियड प्रवासात सहाय्य देण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. चेन्नईमधील यशस्वी पथदर्शी प्रकल्पानंतर, मासिक पाळीच्या दरम्यानच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि स्त्रियांमधील मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी भारतातील अधिकाधिक शहरांपर्यंत पोहोचण्याचे या उपक्रमाचे लक्ष्य आहे.
अमृतांजन हेल्थ केअर लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. एस. संभू प्रसाद म्हणाले, “उद्देश-प्रणीत संस्था म्हणून काम करताना मासिक पाळीच्या काळातील आरोग्याचे महत्त्व आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यामध्ये या गोष्टीची असलेली क्षमता याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. आमचा ठाम विश्वास आहे की प्रत्येक स्त्रीला सुरक्षित आणि आरोग्यदायी मासिक पाळी विषयक निगा उत्पादने सहजी मिळण्याचा अधिकार आहे. कॉम्फीसह, आम्ही मासिक पाळी विषयक समज, समस्या यांबद्दल केवळ जागरुकता वाढवत नाही तर महिलांना त्यांची मासिक पाळी त्यांनी आत्मविश्वासाने आणि अभिमानाने स्वीकारावी यासाठी सक्षम बनवतो. जिथे मासिक पाळी प्रतिष्ठेकडे केवळ विशेषाधिकार म्हणून नाही तर निःसंदिग्धपणे ती गोष्ट बरोबर आहे म्हणून पाहिले जाईल असा समाज निर्माण करायला चालना देण्यासाठी असलेली आमची अतूट बांधिलकी #PowerToBeYou या मोहीमेतून दृढ होते.”
कॉम्फीची ब्रँड ॲम्बेसेडर श्रद्धा कपूर म्हणाली, “मासिक पाळीच्या दरम्यान समानतेला आणि सर्वसमावेशक वातावरणाला चालना देत आपल्याला या गोष्टीकडे निषिद्ध म्हणून बघण्याच्या धारणेत बदल करत त्याकडे सन्मानाने बघण्याची शक्ती मिळते. शिक्षण, सुलभता आणि संवेदनशीलता याला प्राधान्य देऊन आपण एक असे जग आकारु शकतो जिथे प्रत्येक मुलगी #PowerToBeYou चे सार अंगी बाणवत तिचा मासिक पाळीचा प्रवास अभिमानाने, आत्मविश्वासाने आणि सक्षमपणे स्वीकारेल.”
No comments:
Post a Comment