रेनॉ इंडिया आणि बीएलएस ई-सर्विसेसच्या सहयोगाचा ग्रामीण बाजारपेठांमध्ये रेनॉ उत्पादनांची पोहोच व उपलब्धता वाढवण्याचा मनसुबा
मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४ (Mahasagar): रेनॉ इंडिया हा भारतातील युरोपियन कार ब्रॅण्ड आणि बीएलएस ई-सर्विसेस ही बीएलएस इंटरनॅशनलची उपकंपनी यांनी ग्रामीण भारतात रेनॉच्या क्विड, ट्रायबर व कायगरच्या नवीन २०२४ श्रेणीची उपलब्धता व पोहोच वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
या सहयोगाचा नवीन २०२४ श्रेणीची पोहोच व उपलब्धता वाढवण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे ग्रामीण बाजारपेठेतील ग्राहकांच्या उत्पादन अनुभवामध्ये वाढ होईल. या सहयोगाच्या माध्यमातून रेनॉ इंडिया बीएलएस सर्विसेसच्या जवळपास १००,००० टचपॉइण्ट्स, सीएसपी व व्हीएलईच्या व्यापक नेटवर्कसह १,०१६ डिजिटल स्टोअर्सचा फायदा घेत देशभरातील ग्रामीण व अर्ध-शहरी भागांमध्ये रेनॉ कार्सबाबत जागरूकतेला चालना देण्यासोबत विक्रीची सुविधा देईल. कार्स बुक करण्यासाठी बीएलएस ई-सर्विसेसचा अवलंब करणारे ग्राहक विनासायास कार बुकिंग अनुभव, फायनान्स पर्याय आणि टेस्ट ड्राइव्ह सुविधांचा लाभ घेऊ शकतील.
याप्रसंगी मत व्यक्त करत रेनॉ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरआयपीएल) च्या विक्री व विपणन विभागाचे उपाध्यक्ष श्री. सुधीर मल्होत्रा म्हणाले, ''ग्रामीण भारतात आमच्यासाठी मोठी क्षमता आहे आणि बीएलएस ई-सर्विसेससोबतच्या आमच्या सहयोगाच्या माध्यमातून आमचा ग्राहकांच्या अद्वितीय गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या आमच्या मेड-इन-इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड कार्स लाँच करत या बाजारपेठांमधील आमची उपस्थिती वाढवण्याचा मनसुबा आहे. बीएलएसच्या डिजिटल व ऑन-साइट क्षमतांचा लाभ घेत आम्हाला रेनॉचे ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान नवीन व वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गांपर्यंत पोहोचण्याची खात्री आहे.''
बीएलएस ई-सर्विसेसचे अध्यक्ष शिखर अग्रवाल या सहयोगाबात आनंद व्यक्त करत म्हणाले, ''रेनॉ इंडियासोबत सहयोग करत आम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. व्यापक वितरण नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही क्विड, ट्रायबर व कायगरच्या क्षमता ग्रामीण भागांपर्यंत घेऊन जात आहोत. हा सहयोग परिवहनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणेल. तसेच हा परिवर्तनात्मक प्रवास आहे, जो रेनॉच्या ऑटोमोटिव्ह सर्वोत्तमतेला प्रत्यक्ष ग्रामीण भारतात घेऊन जातो. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये होत असलेल्या नाविन्यपूर्ण परिवर्तनाचा अवलंब करा, जेथे आम्ही गतीशीलतेला नव्या उंचीवर घेऊन जात आहोत.''
रेनॉ इंडियासोबतचा हा सहयोग ग्रामीण आर्थिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करण्याच्या बीएलएसच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे, ज्यामधून रेनॉची भारतातील बाजारपेठेप्रती कटिबद्धता अधिक दृढ होते. बीएलएस ई-सर्विसेस सक्रियपणे जागरूकेचा प्रसार करेल आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना त्यांच्या व्यासपीठावरील विविध प्रकारे सामान व सेवांचा पारदर्शकपणे फायदा घेण्यास सक्षम करेल.
No comments:
Post a Comment