Thursday, February 15, 2024

प्रामेरिका लाईफ इन्शुरन्स’ तर्फे तरुण सुधारक आणि समृद्ध समाजाचे ऋण मान्य करणाऱ्या इमर्जिंग व्हिजनरीज प्रोग्रामच्या १३ व्या आवृत्तीची घोषणा


मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ (Mahasagar): प्रामेरिका लाईफ इन्शुरन्स ही भारतात वेगाने विस्तारणारी जीवन विमा उपलब्ध करून देणारी कंपनी असून त्यांच्या वतीने नवकल्पनेला वाहिलेला उपक्रम इमर्जिंग व्हिजनरीज (Emerging Visionaries) या राष्ट्रीय मान्यताप्राप्त कार्यक्रमाच्या १३ व्या आवृत्तीच्या उदघाटनाची घोषणा करण्यात आली. आपल्या समाजासमोर अनेक आर्थिक तसेच सामाजिक आव्हाने आहेत. त्यांचा बिमोड करण्यासाठी कल्पक उपाय सुचविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय मान्यताप्राप्त कार्यक्रमाच्या माध्यमातून पुरस्कार देण्यात येतो.

हा कार्यक्रम म्हणजे प्रुडेंशियल स्पिरीट ऑफ कम्युनिटी अवॉर्डसची प्रगत आवृत्ती आहे. बऱ्याच काळापासून हा कार्यक्रम राबविण्यात येत असून याद्वारे मागील २७ वर्षांपासून जवळपास १५०,००० तरुणांना सन्मानित करण्यात येते आहे. भारतात मागील १३ वर्षांपासून संस्थेचा समृद्ध वारसा सुरू आहे. प्रुडेंशियल फायनान्शियल इंक.च्या ऐतिहासिक उद्देशाला वाहिलेल्या, पिरामल फायनान्सच्या आर्थिक कौशल्याचा लाभ घेत, प्रामेरिका लाईफ इन्शुरन्स, आर्थिक आणि सामाजिक आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय विकसीत करून समाजाकरिता सकारात्मक योगदान देणाऱ्या मुलांच्या उल्लेखनीय प्रयत्नांना मान्यता देण्याचा आणि त्यांचा उत्सव साजरा करण्याचा प्रवास सुरू ठेवते.

नवकल्पना आणि परिवर्तनशील विचारांचा संगम समाजाच्या विकासाला आकार देणारा आहे. याठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण पैलू नमूद करावा लागेल. इमर्जिंग व्हिजनरीज हा कार्यक्रम म्हणजे प्रामेरिका लाईफ इन्शुरन्सने मनोमन केलेली कामना आहे, जी त्यांचा जीवन रक्षक आणि समृद्धीला वाहिलेला ब्रॅंडविषयक दृष्टिकोन सर्वदूर पोहोचवायला मदत करते. समाजासमोर असलेल्या आव्हानांना लक्षात घेत त्यांच्यावर उपाययोजना शोधणाऱ्या मुलांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करत हा कार्यक्रम कंपनीच्या दृष्टिकोनाबद्दल झोकून काम करण्याच्या वृत्तीशी योग्य ती सांगड घालतो. या उपक्रमाच्या माध्यमातून कंपनीचे उद्दिष्ट हे समाजाच्या अधिवासाचे अधिकाधिक कल्याण कसे होईल हे पाहण्याचे आहे.

या कार्यक्रमाच्या प्राथमिक उद्दिष्टाला दोन बाजू आहेत: आपल्या समाजातील तरुण सुधारकांचे हटके प्रयत्न ओळखणे आणि सामाजिक जबाबदारीच्या बृहद संस्कृतीतून प्रेरणा घेणे. या किशोरवयीन नेतृत्वांच्या उपक्रमांना अधोरेखित करून ही कंपनी इतरांना समाजासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी प्रोत्साहनाची अपेक्षा ठेवून आहे. ज्यामुळे एकंदर सकारात्मक बदलाची फळे पिढ्यान-पिढ्या चाखता येतील. या परिवर्तनाचे संवर्धन त्यांचे भविष्यातही होईल.

प्रामेरिका लाईफ इन्शुरन्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वचनबद्ध आहे. नवयुवकांत काहीतरी जिद्दीने करून दाखविण्याची उर्मी असते. अगदी कमी वयात सामाजिक दायित्व म्हणून त्यांचा उद्देश साजरा करणे हेच कंपनीचे ध्येय आहे. मुलांनी समाजात परिवर्तन घडावे म्हणून केलेल्या त्यांच्या प्रयत्नांना पोचपावती देण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून होत असताना एक सहाय्यक परिसंस्था तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिथे मुलं कमी वयातच समाजाच्या भल्याचा विचार करू लागतील आणि आपल्या समाजाला अर्थपूर्ण योगदान लाभेल. एक व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून भावी पिढी घडविण्याच्या दिशेने सुरू करण्यात आलेले हे विधायक कार्य आहे.

“देशाच्या भावी पिढीने कमी वयात घेतलेले अविरत परिश्रम, त्यांची दृढ निश्चयी वृत्ती आणि समाजकल्याणाची आदर्श भावना साजरी करताना आमचा ऊर अभिमानाने दाटून येतो आहे. उद्याची ही पिढी खऱ्या अर्थाने ‘यंग चॅम्पियन’ आहेत,” असे भावनिक उदगार प्रामेरिका लाईफ इन्शुरन्स’चे चीफ बिझनेस ऑफिसर कार्थिक चक्रपाणी यांनी काढले. “या उपक्रमाच्या माध्यमातून, मुलांच्या अनुकरणशील कृतीवर प्रकाश टाकून त्यांनी प्रज्वलित केलेली समाजहिताची ज्योत सर्वांपर्यंत पोहोचवून प्रेरीत करण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे. या मुलांच्या रुपाने देशाचे भविष्य इतके उज्ज्वल आहे की त्यांची नवकल्पकता, जिद्द आणि लवचिकतेचे दर्शन इतरांना या कार्यात योगदान देण्यासाठी नक्की प्रेरणा देईल आणि सामूहिक कृती तसेच करुणामयी मूल्यांचे मूर्त स्वरुप आपल्या जगाच्या अधिक चांगल्या हेतूसाठी प्रयत्नशील राहील”.

यात भर म्हणून ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रक्रियेत, हा कार्यक्रम सर्वसमावेशक शालेय व्याप्तीद्वारे त्याचा प्रभाव विस्तृत करतो. डिजीटल वेबिनार, ऑन-ग्राऊंड प्रेझेंटेशन आणि विद्यार्थी तसेच शालेय व्यवस्थापनासह संवादामार्फत भारतातील टियर १, टियर २ आणि टियर ३ शहरांचा समावेश करत ३०००+ शाळांपर्यंत पोहोचण्याची कंपनीची योजना आहे. या व्यापक सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या विविध श्रेणीपर्यंत कार्यक्रमाच्या उपलब्धततेची खातरजमा होते, सर्वसमावेशकतेला चालना मिळते आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण सुधारकांना सकारात्मक सामाजिक बदलात सहभागी होण्यासाठी, योगदान देण्यासाठी सक्षम करते.

No comments:

Post a Comment