Wednesday, December 27, 2023

ऑलिम्पिक पदकविजेती आणि जगज्जेती पोल व्हॉल्टपटू कॅटी मून टाटा मुंबई मॅरेथॉनची आंतरराष्ट्रीय इव्हेंट अ‍ॅम्बेसेडर



मुंबई मॅरेथानसाठी सज्ज होउया. तसेच निरोगीआणि आनंदी भविष्यासाठी धावूया - मून ऑलिम्पिक पदकविजेती आणि जगज्जेती पोल व्हॉल्टपटू कॅटी मून टाटा मुंबई मॅरेथॉनची आंतरराष्ट्रीय इव्हेंट अ‍ॅम्बेसेडर

-  मुंबई मॅरेथानसाठी सज्ज होउया. तसेच निरोगीआणि आनंदी भविष्यासाठी धावूया - मून

मुंबई, 27 डिसेंबर 2024 (Mahasagar): दोन वेळची जगज्जेती आणि 2020 ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती  पोल व्हॉल्टपटू कॅटी मून ही रविवार, 21 जानेवारी 2024 रोजी होणार्‍या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या19व्या आवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अ‍ॅम्बेसेडर असेल. प्रोकॅम इंटरनॅशनल आयोजित टाटा मुंबई मॅरेथॉन ही जागतिक अ‍ॅथलेटिक्स गोल्ड लेबल रेस आहे.

ऑगस्ट महिन्यात बुडापेस्टमध्ये झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कॅटीने प्रतिस्पर्धी खेळाडू ऑस्ट्रेलियाची निना केनेडी हिच्यासोबत सुवर्णपदक विभागून घेतले. जागतिक स्पर्धेच्या प्रथमच असे पाहायला मिळाले. यामुळे तिच्या मनात पोल व्हॉल्ट खेळाबद्दल आणि तिच्या सहकारी स्पर्धकाबाबत आदर निर्माण झाला. अमेरिकेची ही  32 वर्षीय पोल वॉल्टर 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक राखण्यासाठी आतुर आहे. कॅटी हिच्या नावावर जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये एकूण तीन पदके आहेत.  त्यात बुडापेस्ट आधी बेलग्रेडमधील 2022 वर्ल्ड इनडोअर स्पर्धेतील रौप्य तसेच 2022 यूजीन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदकाचा समावेश आहे. याशिवाय मून हिने 2018 डायमंड लीगमध्ये दोन सुवर्णपदके मिळवलीत.

टाटा मुंबई मॅरेथॉनची इंटरनॅशनल इव्हेंट अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड होणे हा मोठा सन्मान समजते, असे कॅटी मून हिने म्हटले आहे. प्रत्येकाचे जीवन ही एक रेसच आहे. ही रेस धावतानाच्या प्रत्येक पावलामध्ये प्रेरणा बनण्याची आणि आमुलाग्र बदल घडवून आणण्याची संधी असते. टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 साठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. या मॅरेथॉनमधील प्रत्येक वाटचालीत लवचिकता, दृढनिश्चय आणि समुदायाचा आत्मा असतो. मानवी क्षमतेची शक्ती आणि  त्यांच्यातील उत्कृष्टतेचा शोध सेलिब्रेट करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. त्यामुळे मॅरेथॉनमधील प्रत्येक  सहभागींकडून प्रेरणा घेण्यास मी उत्सुक आहे. त्यामुळे मुंबई मॅरेथानसाठी सज्ज होउया. तसेच निरोगीआणि आनंदी भविष्यासाठी धावूया, असे मून म्हणाली.

प्रोकॅम इंटरनॅशनलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक  विवेक सिंग म्हणाले की, आमच्या टाटा मुंबई मॅरेथॉन परिवारात आंतरराष्ट्रीय इव्हेंट अ‍ॅम्बेसेडर म्हणून केटी मूनचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. तिच्या अतुलनीय क्रीडा भावनेने, स्पर्धात्मकतेची, उत्कृष्टतेची आवड आणि सकारात्मक प्रभाव पाडण्याचे समर्पण या अतुलनीय प्रवासात आमच्यासोबत सामील होण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरित करेल, याची मला खात्री आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉन ही जगातील अव्वल 10 मॅरेथॉनपैकी एक आहे. या मॅरेथॉनमध्यश् एकूण 405,000 अमेरिकन डॉलर रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 मध्ये जगभरातून टॉपच्या अ‍ॅथलीट्सनी सहभाग निश्चित केला आहे.

...............

No comments:

Post a Comment