Monday, December 4, 2023

''भारतातील तरूण दर्जेदार झोपेला प्राधान्‍य देण्‍यास उत्‍सुक आहेत'': मॅग्‍नीफ्लेक्‍स स्‍लीप इंडेक्‍स


 जवळपास ४७ टक्‍के प्रतिसादकांनी दर ५ ते १० वर्षांनी त्‍यांच्‍या मॅट्रेसेस बदलल्‍या 

- ५८ टक्‍के प्रतिसादकांनी त्‍यांच्‍या सध्‍याच्‍या मॅट्रेसेसबाबत पुरेसे समाधान व्‍यक्‍त केले 

- ५८ टक्‍के प्रतिसादक उच्‍च-स्‍तरीय मॅट्रेसेसचा वापर करत झोपेचा दर्जा सुधारण्‍यास उत्‍सुक होते 

राष्‍ट्रीय, डिसेंबर ४, २०२३ (Mahasagar): मॅग्‍नीफ्लेक्‍स इंडिया या युरोपमधील पहिल्‍या क्रमांकाच्‍या लक्‍झरी मॅट्रेस ब्रॅण्‍डने नुकतेच केलेल्‍या संशोधनामधून निदर्शनास येते की, प्रिमिअम दर्जाच्‍या मॅट्रेसचा आरोग्‍य व झोपेच्‍या दर्जावर मोठा प्रभाव पडतो हे ग्राहकांना माहित आहे. भारतात १८ ते ७० वर्ष वयोगटातील व्‍यक्‍तींमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या 'मॅग्‍नीफ्लेक्‍स स्‍लीप इंडेक्‍स'मधून निदर्शनास आले की, ५३ टक्‍के सहभागींनी पाठदुखी कमी करण्‍यामध्‍ये उच्‍च स्‍तरीय मॅट्रेसेसच्‍या सकारात्‍मक परिणामाला ओळखले. या निष्‍पत्तींमधून भारतीय आरोग्‍याला देत असलेले प्राधान्‍य आणि एकूण आरोग्‍य सुधारण्‍यासाठी उच्‍च दर्जाच्‍या मॅट्रेसेसमध्‍ये गुंतवणूक करण्‍याप्रती त्‍यांची सुसज्‍जता दिसून येते.

उच्‍च-स्‍तरीय मॅट्रेस खरेदी करण्‍याच्‍या निर्णयास कारणीभूत घटकांमध्‍ये ५० टक्‍के प्रतिसादकांनी कम्‍फर्ट व सपोर्ट यांना अव्‍वल प्राधान्‍य दिले. तसेच, ४२ टक्‍के सहभागींना सुधारित झोपेचा दर्जा व पेन रीलीफ (वेदनेपासून आराम) असे आरोग्‍यदायी फायदे दिसले. यामधून दर्जेदार मॅट्रेसेस उत्तम आरोग्‍याला चालना देण्‍यामध्‍ये बजावणाऱ्या भूमिकेबाबत वाढती जागरूकता निदर्शनास येत आहे. 

स्‍लीप इंडेक्‍सबाबत मत व्‍यक्‍त करत मॅग्‍नीफ्लेक्‍स इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. आनंद निचानी म्‍हणाले, ''आम्‍ही आमच्‍या लक्ष्‍य ग्राहकांच्‍या गरजा व पसंतींची पूर्तता करण्‍यासाठी सखोल माहिती मिळवण्‍याकरिता हा उपक्रम राबवला. या सर्वेक्षणाची सर्वात प्रेरणादायी बाब म्‍हणजे ८४ टक्‍के सहभागींना बाजारपेठेत उपलब्‍ध असलेल्‍या उच्‍च दर्जाच्‍या मॅट्रेसेसबाबत माहित होते. दोन-तृतीयांशहून अधिक (६७ टक्‍के) प्रतिसादकांनी उत्तम दर्जाच्‍या मॅट्रेसमुळे त्‍यांच्‍या खरेदी करण्‍याच्‍या निर्णयामध्‍ये बदल झाल्‍याचे सांगितले, तर १० टक्‍के प्रतिसादकांनी मॅट्रेस खरेदी करताना कम्फर्ट व सपोर्टला प्राधान्‍य दिले.'' 

श्री. निचानी पुढे म्‍हणाले, ''सर्वेक्षणामधील सर्वात महत्त्वाची बाब म्‍हणजे ६३ टक्‍के प्रतिसादक दीर्घकाळापर्यंत आरोग्‍यदायी फायदे देणाऱ्या उच्‍च-स्‍तरीय मॅट्रेसेससारख्‍या प्रिमिअम स्‍लीप सेाल्‍यूशन्‍समध्‍ये गुंतवणूक करण्‍यास उत्‍सुक होते. या निष्‍पत्तींनी आम्‍हाला मॅग्‍नीफ्लेक्‍स इन्‍व्‍हेस्‍टमेंट प्‍लान (एमआयपी) लाँच करण्‍यास प्रेरित केले. हा ईएमआय प्‍लान ग्राहकांना त्‍यांच्‍या पाठीच्‍या कण्याला आधार देऊ शकणारी आणि आरोग्‍यावर परिणाम होण्‍यास कारणीभूत ठरणाऱ्या झोपमोडीचे निराकरण करू शकणारी तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत, उच्‍च दर्जाच्‍या मॅट्रेसची निवड करत त्‍यांच्‍या आरोग्‍याला प्राधान्‍य देण्‍यास प्रेरित करतो. रोचक बाब म्‍हणजे ५० टक्‍के प्रतिसादकांनी ईएमआयच्‍या माध्‍यमातून उच्‍च-स्‍तरीय मॅट्रेस खरेदी करण्‍याप्रती रूची व्‍यक्‍त केली.''  

मॅग्‍नीफ्लेक्‍स स्‍लीप इंडेक्‍सने इन-स्‍टोर व्हिजिट्स आणि टेस्टिंग या खरेदीचा निर्णय घेण्‍याच्‍या सर्वात लोकप्रिय पद्धती असल्‍याचे निदर्शनास आणले. ६० टक्‍के प्रतिसादकांनी प्रत्‍यक्ष अनुभव घेण्‍यावर विश्‍वास दाखवला. मित्र व कुटुंबांकडून शिफारशीचे प्रमाण ५२ टक्‍के होते, तर ऑनलाइन रिव्‍ह्यूज, रेटिंग्‍ज आणि व्‍यावसायिक रिव्‍ह्यूज यांनी देखील महत्त्वाच्‍या भूमिका बजावल्‍या. प्रतिसादक गुंतवणूक करण्‍यास उत्‍सुक असलेल्‍या विविध प्रकारच्‍या उच्‍च-स्‍तरीय मॅट्रेसेसमध्‍ये मेमरी फोम मॅट्रेसेस ४५ टक्‍क्‍यांसह अग्रस्‍थानी होत्‍या, ज्‍यानंतर २५ टक्‍क्‍यांसह कॉटन मॅट्रेसेसचा क्रमांक होता. 

बेंगळुरू, नवी दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, नोएडा, केरळ, कोची, गुरुग्राम, रांची, मंगलोर, कोईम्बतूर, इंदूर आणि जमशेदपूर या १६ शहरांमध्‍ये मॅग्‍नीफ्लेक्‍स स्‍लीप इंडेक्‍स आयोजित करण्‍यात आले. 

मॅग्‍नीफ्लेक्‍स इंडिया बाबत: 

मॅग्‍नीफ्लेक्‍स (मेड इन इटली) युरोपमधील पहिल्‍या क्रमांकाचा मॅट्रेस ब्रॅण्‍ड आहे, जो त्‍यांची कारागिरी, तंत्रज्ञानदृष्‍ट्या उच्‍च दर्जाची उत्‍पादने आणि ग्राहकांना देणारे मूल्‍य यासाठी ओळखला जातो. ६० वर्षांपूर्वी प्रॅटो, इटली येथे लहान वर्कशॉपसह सुरूवात केलेला मॅग्‍नीफ्लेक्‍स लक्‍झरी मॅट्रेस श्रेणीमधील मार्केट लीडर आहे, जेथे ५० दशलक्षहून अधिक व्‍यक्‍तींनी त्‍यांच्‍या मॅट्रेसेसवर उत्तम झोपेचा अनुभव घेतला आहे. मॅग्‍नीफ्लेक्‍सचे १०० हून अधिक उत्‍पादने आहेत, ज्‍यामध्‍ये विविध प्रकारच्‍या मॅट्रेसेस, मॅट्रेस फ्रेम्‍स, पिलोज (उशी) व स्‍लीप अॅक्‍सेसरीजचा समावेश आहे. ब्रॅण्‍डचा कस्‍टमर सेल्‍स सर्विस सॅटीस्‍फॅक्‍शन इंडेक्‍सवर ९९.७ टक्‍के स्‍कोअर आहे. मॅग्‍नीफ्लेक्‍स १०० हून अधिक देशांमध्‍ये उपलब्‍ध आहे आणि भारतीय बाजारपेठेसाठी पॉलिफ्लेक्‍स इंडियासोबत सहयोग केला आहे. 

१९८३ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली पॉलिफ्लेक्‍स इंडिया अत्‍याधुनिक कम्‍फर्ट तंत्रज्ञानांचा वापर करत शक्तिशाली बी२सी व बी२बी ब्रॅण्‍ड्सचा पोर्टफोलिओ विकसित करत आहे आणि भारतीय बाजारपेठेत विचारशील नेतृत्व प्रदान करत आहे. १९८३ मध्‍ये कंपनीने जर्मनीमधून क्रांतिकारी फोम-मेकिंग तंत्रज्ञान आयातित केले आणि भारतात पॉलियुरेथिन (पीयू) फोम उत्‍पादित करणारी पहिली भारतीय कंपनी बनली, त्‍यावेळी ही संकल्‍पना भारतात कधीही ऐकण्‍यात आलेली नव्‍हती. पॉलिफ्लेक्‍स जनरल मोटर्ससाठी दुहेरी शक्तिशाली सीट्स आणि भारतीय रेल्‍वेसाठी अग्निरोधक सीट्स उत्‍पादित करणारी पहिली भारतीय कंपनी आहे.

२०१० मध्‍ये मॅग्‍नीफ्लेक्‍सने भारतात अद्वितीय तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रमाणित मॅट्रेसेस लाँच करण्‍यासाठी भारतीय समूह पॉलिफ्लेक्‍ससोबत सहयोग केला. २०११ मध्‍ये पॉलिफ्लेक्‍सने भारतीय बाजारपेठेसाठी एफएमसीजी ब्रॅण्‍ड 'गॉन मॅड' स्‍थापित केला. इंडोनशियामधील प्रमुख एफएमसीजी कंपनी गरूडा फूडसोबतचा हा संयुक्‍त उद्यम सहयोग आहे. 





No comments:

Post a Comment