Friday, November 3, 2023

ESAF Small Finance Bank IPO : आयपीओ आज उघडला, गुंतवणूक करण्यापूर्वी तपशील जाणून घ्या



मुंबई, 3 नोव्हेंबर, 2023 (महासागर/बबिता):
आयपीओ गुंतवणुकदारांसाठी एक सुवर्ण संधी आहे. ESAF स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ आजपासून म्हणजेच शुक्रवार 3 नोव्हेंबर 2023 पासून गुंतवणुकीसाठी उघडला आहे. गुंतवणूकदार 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत या आयपीओमध्ये पैसे गुंतवू शकतात. या आयपीओच्या माध्यमातून बँक 463 कोटी रुपये उभारणार आहे.

प्राइस बँड

ESAF स्मॉल फायनान्स बँक आयपीओसाठी किंमत बँड 57 रुपये ते 60 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. आयपीओमध्ये कंपनी एकूण 390.70 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. तर 72.30 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकले जात आहेत. कंपनीचे प्रवर्तक ESAF फायनान्शियल होल्डिंग्स ऑफर फॉर सेलद्वारे 49.26 कोटी रुपयांचे शेअर्स विकतील. तर पीएनबी मेटलाइफ इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि बजाज आलियांज लाइफ इन्शुरन्स कंपनी ऑफर फॉर सेलमध्ये 23.04 कोटी रुपयांचे शेअर्स विकतील.

किती गुंतवणूक करावी लागेल?
या आयपीओमध्ये गुंतवणुकदाराला किमान 250 शेअर्स खरेदी करावे लागतील. यानंतर 250 शेअर्सच्या लॉट साइजमध्ये गुंतवणूक करू शकता. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 14,250 रुपये गुंतवावे लागतील. कंपनीने आयपीओ उघडण्यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून 135.15 कोटी रुपये गोळा केले आहेत.

कर्मचाऱ्यांसाठी शेअर्स राखीव
या आयपीओमध्ये कंपनीने पात्र संस्थागत खरेदीदारांसाठी 50 टक्के आणि बिगर संस्थात्मक खरेदीदारांसाठी 15 टक्के हिस्सा राखून ठेवला आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा निश्चित करण्यात आला आहे. बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 12.5 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स राखून ठेवले आहेत.

शेअर्सचे लिस्टिंग
ESAF स्मॉल फायनान्स बँक 10 नोव्हेंबरपर्यंत आयपीओ शेअर्सचे वाटप अंतिम करेल आणि 15 नोव्हेंबरपर्यंत इक्विटी शेअर्स पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग 16 नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर होणार आहे.Ends

No comments:

Post a Comment