वर्चूसा कॉर्पोरेशन आणि बी.जे.पी.सी. इन्स्टिट्यूशनच्या विश्वस्तांकडून संयुक्तरित्या ऐतिहासिक पुनरूत्थित संस्थेचे उद्घाटन
मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३ (Mahasagar News): डिजिटल इंजीनियरिंग आणि प्रौद्योगिकी सेवा प्रदान करणाऱ्या वर्चुसा कॉर्पोरेशन या अग्रणी कंपनीने वर्चुसा फाउंडेशनच्या माध्यमातून बयरामजी जीजीभॉय पारसी चॅरिटेबल इन्स्टिट्यूट (B.J.P.C.I) हेरिटेज स्कूल रिस्टोरेशन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची घोषणा करताना आनंद व्यक्त केला. या ऐतिहासिक संस्थेचे पुनरूत्थान झाल्यामुळे इतिहासाचा एक महत्त्वाचा तुकडा तर जतन होईलच पण त्याचबरोबर वर्चूसाच्या शिक्षणाला चालना देण्याच्या, पुढील पिढीचे सक्षमीकरण आणि शाश्वत वातावरणातील योगदानाप्रति वचनबद्धतेचा पुनरूच्चारही झाला आहे.
ख्यातनाम अभिनेता आणि बी.जी.पी.सी.आय.चा माजी विद्यार्थी असलेल्या स्वप्नील जोशी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्याचबरोबर वर्चूसा कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक संतोष थॉमस, वर्चूसा कॉर्पोरेशनचे मुख्य वित्तीय अधिकारी अमित बजोरिया, वर्चूसा कॉर्पोरेशनचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राम मीनाक्षीसुंदरम, आणि बी.जे.पी.सी.आय.च्या विश्वस्तांनी एकत्रितरित्या अत्यंत आकर्षक अशा कॉफी टेबल बुक “अनरॅपिंग दि स्टोरी ऑफ ए लँडमार्क रिस्टोरेशन,”चे अनावरण केले आणि त्यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने अविस्मरणीय आणि अर्थपूर्ण झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना, वर्चूसा कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक संतोष थॉमस म्हणाले की, "या ऐतिहासिक वास्तूच्या पुनरूत्थानासाठी बयरामजी जीजीभॉय पारसी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन (बी.जे.पी.सी.आय.) सोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सामाजिक उत्तरदायित्वात प्रचंड विश्वास ठेवणारी कंपनी म्हणून हा प्रकल्प आमच्या कॉर्पोरेट उत्तरदायित्वाच्या कल्पनांशी जुळणारा आहे."
ते पुढे म्हणाले की, "वर्चूसा कॉर्पोरेशनने मागील १५ वर्षांपासून शिक्षणाची व्याप्ती वाढवण्यासाठी एक सर्वांगीण कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांमुळे २०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. आज या १३२ वर्षे जुन्या सुंदर वास्तूचे पुनरूत्थान करत असताना आम्हाला या मोहिमेत आणखी एक टप्पा पार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे पुढील अनेक पिढ्या विद्यार्थी आणि समाजाला त्याचा लाभ होऊ शकेल. या ऐतिहासिक वारशाच्या पुनरूत्थानासाठी मदत तसेच इतिहासाचा तुकडा जतन केल्यामुळे तरूण मनांना संधींचे द्वार खुले होऊ शकेल. या मोहिमेत बी.जे.पी.सी.आय.ला मदत करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे, कारण त्यामुळे अगणित विद्यार्थ्यांची स्वप्ने पुढील अनेक वर्षे जपता येतील."
बी.जे.पी.सी.आय.ची स्थापना १८९१ साली झाली आणि ही संस्था मुंबईच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक इतिहासात एक महत्त्वाचे स्थान भूषवते. ३३, एन. कर्वे मार्ग येथे स्थित ही दिमाखदार वास्तुरचना शहराच्या समृद्ध वारशाचा एक महत्त्वाचा घटक आहे. बी.जे.पी.सी.ए. ही संस्था मुंबईत एक ऐतिहासिक रचना म्हणून ओळखली जाते आणि तिला "सर्वोत्तम जतन केलेली ऐतिहासिक इमारत" असल्याचा अर्बन हेरिटेज अवॉर्ड देऊन १९९३ साली गौरवण्यात आले होते.
बी.जे.पी.सी. संस्थेची आणि पुनरूत्थान प्रकल्पाची प्रमुख वैशिष्टे खालीलप्रमाणे आहेतः
- ऐतिहासिक महत्त्वः बी.जे.पी.सी.आय. चा इतिहास १३२ पेक्षा अधिक वर्षांचा असून ती मुंबईच्या सर्वांत जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे आणि शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात तिचे मोठे योगदान आहे.
- वास्तुरचनात्मक सौंदर्य: संस्थेच्या ऐतिहासिक इमारतीची रचना मास्टर आर्किटेक्ट खान बहादूर मंचेरजी सी. मर्झबान यांनी केली होती. ही रचना गॉथिक रिव्हायव्हल शैलीतील आहे आणि अत्यंत सुंदर सागवानी स्क्रीन आणि रंगीत काचांचा त्यात वापर करण्यात आला आहे.
- शैक्षणिक सर्वोत्तमता: बी.जे.पी.सी.आय. मधून किंडरगार्टन ते वरच्या वर्गांपर्यंत विविध प्रकारचे सर्वांगीण शैक्षणिक अभ्यासक्रम दिले जातात आणि येथे १४०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिकतात. या संस्थेचा बोर्ड परीक्षेमध्ये सातत्याने १०० टक्क्यांचा यशाचा दर आहे आणि त्यामुळे शैक्षणिक सर्वोत्तमतेप्रति आपल्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला ती जपते.
वर्चूसा कॉर्पोरेशनचे मुख्य वित्तीय अधिकारी अमित बजोरिया यांनी ही भावना स्पष्ट करून सांगितले की, "बयरामजी जीजीभॉय पारसी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन (बी.जे.पी.सी.आय.) सारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या शाळेचे पुनरूत्थान तिचा वारसाच जपत नाही तर भविष्यातील पिढ्यांचे सक्षमीकरण देखील करते."
ते पुढे म्हणाले की, " या उपक्रमातील आमच्या सहभागामुळे आम्हाला खूप समाधान मिळाले आहे आणि हे यश वर्तुसा फाऊंडेशनच्या शिक्षणात प्रवेश वाढवणे, पर्यावरण जतन करणे आणि समाजाचे सक्षमीकरण करणे या मुख्य स्तंभांशी सुसंगत आहे."
बी.जे.पी.सी. इन्स्टिट्यूशनचे विश्वस्त रूस्तम एन. बी. यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, "आमचे सहयोगी असलेल्या वर्चूसाने इमारतीच्या पुनरूत्थान आणि नूतनीकरणासाठी अत्यंत दानशूरपणे वित्तपुरवठा केला आहे. त्यांचा संयम आणि वेळेत निधी उपलब्ध केल्यामुळे जुन्या आणि नव्याने नूतनीकरण केलेल्या इमारतीतील फरक दिसून येतो. ही इमारत आपल्या शहरात दुर्मिळ आहे आणि आम्हाला हे सांगताना खूप आनंद आणि अभिमान वाटतो की, ती आमच्या वास्तुरचनाकाराकडून युनेस्को हेरिटेज एवॉर्डसाठी प्रवेशिका म्हणून पाठवली जाईल. बी.जे.पी.सी.आय.चे विश्वस्त, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून वर्चूसा कॉर्पोरेशनचे खूप आभारी आहोत."
वर्चूसा फाऊंडेशन धोरणात्मक भागीदारी आणि कार्यरत सामाजिक सहभागाद्वारे उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग आखत असताना सामाजिक आव्हानांचा सामना करण्यासाठीही वचनबद्ध आहे. वर्चूसा कलात्मक समस्या सोडवण्यासाठी "इंजिनीअरिंग फर्स्ट" दृष्टीकोन वापरते. त्याद्वारे व्यक्ती आणि समाजाला सर्वांसाठी सामाजिक लाभ देणे शक्य होते. याच दृष्टीकोनाला वर्चूसाकडून "इंजिनीअरिंग विथ पर्पज" असे नाव दिले गेले आहे.
वर्चूसा बाबत:
वर्चूसा कॉर्पोरेशन ही कंपनी जगभरात डिजिटल व्यवसाय धोरण, डिजिटल अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) सेवा तसेच उपाययोजना देणारी असून त्यामुळे नावीन्यपूर्ण अभियांत्रिकीद्वारे त्यांच्या ग्राहकांना बदलणे, क्रांती घडवणे आणि नवनवीन संधीं मिळवणे शक्य होते. वर्चूसा बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, आरोग्यसेवा, जनसंपर्क, प्रसारमाध्यम, मनोरंजन, पर्यटन, उत्पादन आणि तंत्रज्ञान उद्योगांमध्ये ग्लोबल २००० कंपन्यांना सेवा देते.
वर्चूसा आपल्या ग्राहकांना नावीन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांसोबत आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे डिजिटल कर्मचारी, भविष्यासाठी सुसंगत कार्यान्वयन आणि आयटी प्लॅटफॉर्म्स तसेच रॅशनलायझेशन आणि आयटी उपयोजन पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे शक्य होते. हे सर्व सखोल दृष्टीकोन बदल संकल्पनात्मक ज्ञान, सक्षमीकृत मजबूत टीम्स आणि उत्तम दर्जाच्या अभियांत्रिकीद्वारे केले जाऊन सर्वांगीण उपाययोजना तयार केल्या जातात. त्या व्यवसायाला सहकार्याच्या माध्यमातून एका अभूतपूर्व सर्वोत्तम कामगिरीच्या दृष्टीने पुढे नेतात.
वर्चूसा हा वर्चूसा कॉर्पोरेशनचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. कंपनीची इतर सर्व नावे आणि ब्रँडची नावे त्यांच्या संबंधित धारकांचे ट्रेडमार्क किंवा सेवा चिन्हे असू शकतात.
No comments:
Post a Comment