मुंबई,२२ नोव्हेंबर२०२३ (Mahasagar):- बँक ऑफ बडोदा, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एकने,आज 'बडोदा किसान पखवाडा' च्या सहाव्या आवृत्तीच्या उद्घाटनाची घोषणा केली, जो बँकेचा भारतीय कृषी अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणारा दोन आठवड्यांचा वार्षिक आउटरीच कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांशी जोडण्यासाठी समर्पित हा कार्यक्रम 16 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाला असून 30 नोव्हेंबर 2023 रोजी बडोदा शेतकरी दिन समारंभाने समारोप होईल. दोन आठवड्यांच्या या कृषी उत्सवात बँकेच्या देशभरातील निमशहरी, ग्रामीण आणि निवडक मेट्रो आणि शहरी शाखा सक्रियपणे सहभागी होतील. बडोदा किसान पखवाडा दरम्यान, बँकेने विविध कार्यक्रमांद्वारे ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
No comments:
Post a Comment