Thursday, September 7, 2023

शॉपर्स स्टॉप’तर्फे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर सान्या मल्होत्रासह नवीन फ्रॅटीनी कलेक्शनचे अनावरण



त्यांचे नवीन फ्रॅटीनी कॅम्पेन लाईव्ह एपिक लॉन्च~

मुंबईसप्टेंबर, 2023 (महासागर न्यूज):- खासगी ब्रँडवर लक्ष केंद्रित करण्याच्या आपल्या विकासाच्या प्रमुख रणनीतिसह यंदाच्या मोसमात शॉपर्स स्टॉपच्या वतीने त्यांचे नवीन कॅम्पेन लाईव्ह एपिकसह नव्याकोऱ्या फ्रॅटीनी कलेक्शनचे लॉन्च त्यांची ब्रँड अ‍ॅॅॅॅम्बेसेडर सान्या मल्होत्रा हिच्या साथीने करण्यात आले.

लाईव्ह एपिक मोहिमेत फ्रॅटिनी मुलीची वृत्ती अंतर्भूत आहेजी आत्मविश्वास वाढवते आणि सहजतेने स्वत:ची अनोखी शैली व्यक्त करतेज्याद्वारे एक स्टायलिश आणि ट्रेंडी स्मार्ट कॅज्युअल वेअर कलेक्शन सादर करण्यात येईलहा संग्रह व्यक्तींना आत्मविश्वासाने पुरेपूर जीवन जगण्यासाठी प्रेरित करेल.

फ्रॅटीनी कॅम्पेनमध्ये सान्याचे चित्रण एका आनंदी वृत्तीच्याआत्मविश्वासू फ्रॅटीनी मुलीप्रमाणे केले असून तिला दोन्ही विश्वांकडून सगळं उत्तमोत्तम मिळविण्याची आकांक्षा आहेआजच्या काळातील महिलेला कोणतीही निवड  करता आयुष्य भरभरून जगायचे आहेतिचे ठाशीव व्यक्तिमत्व उत्साही साहसआईसोबतचे अर्थवाही प्रसंगप्रवासाचा शोध घेणारी पॅशनकरियरमध्ये पुढे जाण्याची जिद्द आणि मैत्रीत प्रेम शोधण्याच्या प्रयत्नांनी झगमगते आहेया जाहिरातीला आनंदी संगीताची गोडी लाभल्याने कोणत्याही तडजोडीशिवाय महान जीवन जगण्याची पद्धत अधिक प्रभावीपणे अधोरेखित होते.     

नवीन फ्रॅटीनी कलेक्शन ड्रेसमॉडर्न वर्कवेअर आणि आरामदायक कॅज्यूअलची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देईल, ज्यामध्ये सुंदर रंगसंगती आणि शिलाईचा मिलाफ दिसणार आहेया कलेक्शनचे ध्येय आजच्या महिलांच्या वैविध्यपूर्ण पसंतीला साजेशा तितक्याच विविधतापूर्ण फॅशनमधून करायचे आहे.  

या मोहिमेबद्दल बोलतानाशॉपर्स स्टॉपच्या कस्टमर केअर असोसिएट आणि मार्केटिंग  कम्युनिकेशन प्रमुख श्वेतल बसू म्हणाल्या; "शॉपर्स स्टॉपवरआम्ही आमच्या ग्राहकांना प्रेरणा देण्यासाठी तसेच गुंतवूनठेवण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहोतस्व-अभिव्यक्ती ही फॅशनच्या केंद्रस्थानी आहेयावर आमचा विश्वास आहे. फ्रॅटिनीसाठी 'लाईव्ह एपिकमोहीम संपूर्ण आत्मविश्वासाने लोकांना जीवन जगण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी ब्रँडचे समर्पण अधोरेखित करतेफक्त जगू नका, महाकाव्य निर्माण होईल असे जगा!

ब्रँड अ‍ॅॅॅॅम्बेसेडर सान्या मल्होत्रा यांनी आपला उत्साह शब्दांत मांडताना सांगितले, "फ्रॅटीनीच्या नवीनकोऱ्या कॅम्पेनचा भाग होण्यासाठी तसेच शॉपर्स स्टॉपचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी अतिशय खूश आहेहे भारतातील सर्वाधिक पसंतीचे फॅशन आणि ब्युटी डेस्टीनेशन आहेफ्रॅटीनी संग्रहात स्टाईल तसेच मुक्त फॅशन निवेदनाचा सुंदर संगम पाहायला मिळेलमी लाईव्ह एपिक कॅम्पेनमध्ये निराळ्या स्थितीतील जीवनविषयक निवडींचा स्वीकार करताना दिसणार आहेया कॅम्पेनकरिता ज्या पद्धतीने सर्जनशील अभिव्यक्ती सादर करण्यात आली आहेमी त्याकरिता खासकरून उत्सुक आहे. 

फ्रॅटीनीचे नवीन कलेक्शन शॉपर्स स्टॉप दालनांत त्याचप्रमाणे www.shoppersstop.com वर ऑनलाईन उपलब्ध आहे



No comments:

Post a Comment