आयटी, आयटीईएस आणि इतर बिगर आयटी क्षेत्रांमध्ये महिलांच्या प्रतिनिधीत्वामध्ये वाढ
• व्यवसायातील महत्वाच्या नेतृत्वांमध्ये देखील महिलांचा 20% पेक्षा अधिक वाटा
मुंबई, सप्टेंबर 13, 2023 (महासागर न्यूज): अवतार समूह, भारतातील डायवर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन (डीईआय) सोल्युशन्स फ़र्म असून, यांच्या द्वारे आज भारतातील आठव्या अवतार आणि सेरामाऊंट बेस्ट कंपनी फ़ॉर वुमन इन इंडियाची (BCWI) यादी जाहिर करण्यता आली. अवतारद्वारे पाचवा, अवतार आणि सेरामाऊंट मोस्ट इन्क्लुझिव कंपनी इंडेक्स (MICI) देखील जाहिर करण्यात आला ज्यामध्ये देशातील डाइवर्सिटीचा अनुषंगाने समावेशकता दर्शविणाऱ्या कंपन्यांचा निर्देशांक नमूद केला गेला.
BCWI-MICI अभ्यासाची आठवी आवृत्ती फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू झाली, यामध्ये विविध उद्योग क्षेत्रातील 354 कंपन्या सहभागी झाल्या होत्या, ज्यांचे 300 पेक्षा जास्त DEI मेट्रिक्सचे मूल्यांकन करण्यात आले होते. व्यापक अशा 2023 च्या BCWI-MICI अभ्यासातून जेंडर डाइवर्सिटीचे पालन करणाऱ्या 100 सर्वोत्तम कंपन्यांवरती प्रकाश टाकण्यात आला. अभ्यासातून असे लक्षात आले की सर्वोत्तम अशा 100 कंपन्यांनी 3.38 Lakh महिला कर्मचारी तर 5.59 लाख पुरूष कर्मचाऱ्यांची भरती 2023 सालामध्ये केली. एकूण कर्मचाऱ्यांमध्ये 37.7% महिला होत्या, जे लैंगिक समानतेवर भर देण्याचा कल दर्शविणारे आहे. तरी देखील, अभ्यासानुसार एकूण लैंगिक गुणोत्तराचा विचार केला तर 2022 च्या 38.6% च्या तुलनेत 1% घट झाली आहे. आयटी क्षेत्रामध्ये 3.46 लाख पुरूषांच्या तुलनेत 2.02 लाख महिला असल्याचे लक्षात आले, तर कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये 2023 मध्ये 1.3 लाख पुरूषांच्या तुलनेत 94,000 लाख महिलांना नोकरी देण्यात आल्याचे लक्षात आले आहे.
भारतातील महिलांसाठीच्या 100 सर्वोत्तम कंपन्यांचे वैशिष्ठ्य असे की, यातील 31% कंपन्या या मूळच्या भारतीय आहेत, तर इतर कंपन्या या मल्टीनॅशनल आहेत.
खाली क्रमशा: 2023 च्या 10 महिलांकरिताच्या सर्वोत्तम कंपन्यांची नावे देण्यात आलेली आहेत:
- ॲक्सेंचर सोल्युशन्स प्रायवेट लिमिटेड
- बार्कलेज इंडिया
- सिटीबॅंक
- ईवाय
- आयबीएम इंडिया प्रायवेट लिमिटेड
- इन्फ़ोसिस लिमिटेड
- केपीएमजी इन इंडिया
- पब्लिसिस सैपियंट-टीएलजी इंडिया प्रायवेट लिमिटेडचा विभाग असलेली
- टेक महिंद्रा लिमिटेड
- झेडएस
2023च्या अवतार आणि सेरामाऊंट मोस्ट इन्क्ल्युझिव कंपनी इंडेक्स (MICI)मध्ये भाग घेतलेल्या आणि प्रेस्टिजियस चॅम्पियन्स ऑफ़ इनक्लूजन इंडेक्स मध्ये 75% पेक्षा अधिक इनक्लूजन इंडेक्स गुण मिळविलेल्या कंपन्या खालील प्रमाणे आहेत.
- ॲक्सेंचर सोल्युशन्स प्रायवेट लिमिटेड
- सिटीबॅंक
- ईवाय
- आयबीएम इंडिया प्रायवेट लिमिटेड
- इन्फ़ोसिस लिमिटेड
- केपीएमजी इन इंडिया
- मिडलॅन्ड क्रेडिट मॅनेजमेंट इंडिया प्रायवेट लिमिटेड
- मॉर्गन स्टॅनले ॲडवान्टेज सर्व्हिसेस
- टार्गेट कॉर्पोरेशन इंडिया प्रायवेट लिमिटेड
- टेक महिंद्रा लिमिटेड
अभ्यासातील निकाल आणि महत्वाचे मुद्दे सादर करते वेळी, बोलताना अवतार समूहाच्या अध्यक्ष डॉ. सौंदर्या राजेश म्हणाल्या, “ ईएसजी (पर्यावरण, सामाजिक आणि शासन) च्या ध्येय पूर्तीचा “सामाजिक” भाग हा या 100 सर्वोत्तम भारतीय कंपन्यांकरिता सगळ्यात प्रमुख ठिकाणी आहे. 2023 चा वार्षिक BCWI-MICI हा DEI च्या दृष्टीकोनातून एक मापक असून, या इंडिया इंक ईएसजीच्या “सामाजिक” प्राधान्यांपैकी एक आहे, प्रगतीच्या या मार्गावरती, माहिती हेच आमचे होकायंत्र ठरते. हा अभ्यास सुरू करते वेळी 2016 साली महिलांचे प्रतिनिधीत्व हे 25% असल्याचे दिसून आले होते, पण आता 100 सर्वोत्तम कंपन्यांमध्ये लैंगिक भिन्नता वाढताना दिसून येत असून, 2023 मधील महिलांचे सरासरी प्रतिनिधीत्व (एकूण) हे 36.9% आहे, जे फ़ारच आशादायी आहे आणि सध्याच्या दरानुसार सर्वोत्तम कंपन्यांमध्ये 50:50 लैंगिक समानता ही 2030 पर्यंत सत्यात उतरेल असा आमचा विश्वास आहे – वैश्विक महामारी नंतर आलेल्या मंदीनंतरही हा काळ तसा फ़ार लवकर आला आहे .”
“या संख्याच आमचे मार्गदर्शन करतील, ज्यामुळे सगळ्यांकरिता एक समान कामाचे ठिकाण निर्माण करण्याकरिता आम्हाला ब्लूप्रिंट नक्कीच मिळेल. केलेल्या प्रगतीबद्दल आम्हाला आनंदच आहे, पण असलेल्या आव्हानांचा विचार देखील नक्कीच करून ठेवायला हवा. कंपन्यांद्वारे DEI वरील खर्च हा कमी होत असल्याचे देखील आमच्या लक्षात आलेले आहे, पण हा एकूणच जागतिक मंदीचा देखील प्रभाव असू शकतो. एकूणच DEI च्या उत्तरदायित्वाशी संबंधित निकषांमध्ये देखील घट आलेली आहे. मागील वर्षी 97.5% कंपन्यांचा MICI निर्देशांक हा व्यवस्थापकांच्या जबाबदारीवरतीच ठरविण्यात आला होता, यंदाच्या वर्षभरामध्ये या टक्केवारीत घट झालेली असून ती 93% एवढी झाली आहे. यावरून असे लक्षात येते की लैंगिक गुणोत्तरामध्ये किरकोळ घट झालेली दिसून येते आणि एकूणच DEI च्या खर्चातील घट यांचा संबंध असू शकतो. “ असे देखील डॉ. सौंदर्यायांनी सांगितले.
“भारतातील बऱ्याचशा समावेश कंपन्यांमधील कॉर्पोरेशन्स आपल्या कर्मचाऱ्यांना व्यापक असे कामाचे ठिकाण निर्माण करण्यास बांधिलकी दर्शवितात.” असे सेरामाऊंटच्या अध्यक्षा सुभा बॅरी म्हणाल्या. “विकास आणि सुधारणेच्या संधी ओळखण्यासाठी आवश्यक पावले उचलताना, त्यांच्या DEI च्या उपक्रमांची प्रभावीतता मोजत त्यांची प्रगती ओळखण्यास आम्हाला अभिमान वाटतो. “ असे देखील पुढे त्या म्हणाल्या.
No comments:
Post a Comment