मुंबई, 8 ऑगस्ट 2023 (Mahasagar News Desk): ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ही शिखर व्यापार संस्था असून त्यांच्यातर्फे ज्वेलरी निर्माते, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, निर्यातदार यांना संघटित करण्यात येते. या संस्थेतर्फे 12 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत 300 शहरांमध्ये इंडिया ज्वेलरी शॉपिंग फेस्टिव्हल (IJSF) आयोजित करण्यात आले आहे, अशी घोषणा करण्यात आली. देशभरात आयोजित या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये 5000 हून अधिक ज्वेलरी रिटेलर आणि वितरक सहभागी होतील आणि या क्षेत्रातील व्यावसायिक भावनेला चालना देण्यास मदत करतील, अशी अपेक्षा आहे. या इव्हेंटसाठी डिव्हाइन सॉलिटेअर हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत.
या महोत्सवाचा लाभ बी2बी आणि बी2सी अशा दोन्ही सेगमेंट्सना होणार आहे. या ठिकाणी व्यवसाय मालक नोंदणी शुल्क भरून आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सबस्क्रिप्शन प्लॅनमधून एका प्लॅनची निवड करून या महोत्सवाचा भाग होऊ शकतात. बी2बी सेगमेंटसाठी 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत स्कीम सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘द अमृत महोत्सवा’चे औचित्य साधून लिमिटेड एडिशनच्या चांदीच्या नाण्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
GJCचे संचालक आणि IJSFचे कन्व्हेनर श्री. दिनेश जैन म्हणाले, "2021-2022 या कालावधीत भारताच्या जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्राच्या निर्यातीमध्ये त्या आधीच्या वर्षापेक्षा 54.68% वाढ झाली आणि या क्षेत्राची उलाढाल 39.45 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. जगातील 200 देशांपैकी फक्त 10 टक्के देशांमध्ये रत्नांची निर्मिती होते. त्यामुळे या क्षेत्रातील प्रचंड क्षमता अधोरेखित होते. ज्वेलरीच्या चाहत्यांच्या मनात भारताला मानाचे स्थान मिळवून देणे आणि भारतातील ज्वेलरी टुरिझमला चालना देणे हे कंपनीचे ध्येय आहे. कारण भारत येथील नाजूक डिझाइन्स आणि नक्षीकामासाठी जगभरात ओळखला जातो. भारताबाहेरून या महोत्सवासाठी येणाऱ्या अभ्यागतांना (GST refunds and import charges) जीएसटी परतावा आणि आयात शुल्क परतावा उपलब्ध करून देत करून देत वाजवी किमतीत ज्वेलरी उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे. या संदर्भात आम्ही प्रशासनाशी संपर्क साधलेला आहे. दुबई शॉपिंग फेस्टिव्हल प्रचंड यशस्वी करणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे.
IJSFच्या या उपक्रमासाठी 2.4 मिलियन ग्राहक उपस्थिती दर्शवतील आणि रु.120000 कोटींची विक्री होईल, असा अंदाज आहे. ज्वेलरी मूल्यसाखळीचे योगदान रु.100 कोटी इतके धरले आणि परदेशी चलनातून रु.3,000 कोटी प्राप्त झाले. IJSFचा भारतीयाच्या CAD वर सकारात्मक परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे ज्लेवरी क्षेत्राकडून जीडीपीमध्ये दिल्या जाणाऱ्या योगदानातही भर पडेल.
GJCचे चेअरमन श्री सैयम मेहरा म्हणाले, "ज्वेलरीच्या सर्व व्यापाऱ्यांसाठी IJSF ही एक मोठी संधी आहे आणि या क्षेत्रातील महत्त्वाच्या सहभागींनी यात खूप स्वारस्य दर्शविले आहे. या इव्हेंटचा ग्राहक आणि निर्माते अशा दोघांनाही फायदा होणार आहे. ज्वेलर्सना विस्तारकरणाची आणि विक्री वाढविण्याची संधी आहे. दुसरीकडे, खरेदीदारांना लग्नसमारंभ आणि इतर विशेष दिवसांसाठी खास तयार केलेल दागिने उपलब्ध होऊन त्यांना बचतही करता येणार आहे. या इव्हेंटमध्ये संपूर्ण मूल्यसाखळीला सहभागी करून घेत या इव्हेंटमधून भरपूर उत्पन्न मिळवता येईल याची खात्री जेम अँड ज्वेलरी कौन्सिलतर्फे देण्यात आली आहे. या इव्हेंटमध्ये औद्योगिक चालना देण्यात येणार आहे आणि ग्राहकांनाही इन्सेन्टिव्ह मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रस्थापित बिझनेस मॉडेल्ससह प्रसिद्ध ज्वेलर्सचा प्रचार करून व्यावसायिकता आणि सर्वोत्तम व्यावसायिक पद्धतींना चालना देण्यात येणार आहे."
सहआमंत्रक श्री मनोज झा म्हणाले, "या इव्हेंटमधून संपूर्ण ज्वेलरी बिझनेस तसेच ग्राहकांचाही लाभ व्हावा, अशी आमची इच्छा आहे. क्लाएंटची उत्कंठा वाढावी आणि सहभाग वाढावा यासाठी त्यांच्यातर्फे अनेक प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. IJSFतर्फे आकर्षक ऑफर उपलब्ध करून देण्यात येतील आणि ग्राहकांना तब्बल 40 किलो सोने, रु.3 कोटींची ज्वेलरी आणि डिव्हाइन सॉलिटेअर डायमंड्सचा मुलामा असलेली 100 सोन्याची नाणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे 75 वे वर्ष साजरे होत असताना आम्ही 3000 किलो चांदीची खास अमृत महोत्सव सिल्व्हर कॉइन्स स्मरणिका म्हणून उपलब्ध करून देणार आहोत. रु.25,000 च्या प्रत्येक खरेदीसाठी हे चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे या सणासुदीच्या हंगामात उद्योगाला चालना मिळणार आहे. संपूर्ण खुलेपणाची खातरजमा करण्यासाठी आम्ही ईवायसोबत भागीदारी केली आहे. ते या प्रक्रियेचे कामकाज पाहणार आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असेल.
IJSFच्या अटी व शर्ती या विषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी कृपया www.ijsfindia.org या वेबसाइटला भेट द्यावी.
जेजीसीबद्दल : ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे. उद्योग, त्यांचे कामकाज आणि अस्तित्व या संदर्भातील मुद्दे सर्व अंगांनी हाताळण्यासाठी आणि या क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी व त्याचवेळी या उद्योगक्षेत्राच्या हिताचे संरक्षण करण्याच्या हेतून ही संस्था स्थापन करण्यात आली. गेल्या 18 वर्षांपासून जेजीसी ही संस्था सरकार आणि व्यापार यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे आणि या क्षेत्राच्या वतीने आणि या क्षेत्रासाठी अनेक उपक्रम राबवत आहे.
No comments:
Post a Comment