Thursday, January 5, 2023

इनक्रेड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकडून सुरक्षित, विमोचनीय, अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीतून ₹ ३५० कोटींपर्यंत निधी उभारण्याची घोषणा

 



·        प्रतिवर्ष १०.०२% पर्यंत प्रभावी लाभ- मालिका IV साठी

·        पतमानांकन : क्रिसिल रेटिंग्स लिमिटेड द्वारे 'क्रिसिल ए+/स्थिर'

·        रोखे विक्री ९ जानेवारी २०२३ रोजी खुली होईल आणि भरणा पूर्ण झाल्यास मुदतपूर्व बंद करण्याच्या पर्यायासह २७ जानेवारी २०२३ रोजी बंद होईल.

·        एनसीडीचे व्यवहार हे डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात होतील

·        प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर रोख्यांचे वाटप. तथापिभरणा पूर्ण झाल्याच्या तारखेपासून आणि त्यानंतर आलेल्या अर्जदारांना प्रमाणानुसार वाटप केले जाईल.

 

मुंबई५ जानेवारी २०२३ (महासागर संवाददाता): ठेवी न स्वीकारणारी महत्त्वाची बँकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) इनक्रेड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आज सुरक्षितविमोचन करण्यायोग्य आणि अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीची घोषणा केली. प्रत्येकी  ,००० दर्शनी मूल्य असलेले एकूण  १७५ कोटीपर्यंत (“बेस इश्यू”) तसेच अतिरिक्त भरणा झाल्यास एकूण   ३५० कोटींपर्यंत (“इश्यू”) निधी राखून ठेवण्याच्या पर्यायासह ही रोखे विक्री सोमवार९ जानेवारी २०२३ रोजी खुली होईल आणि शुक्रवार२७ जानेवारी २०२३ रोजी बंद होणार आहे. रोखे विक्रीअंतर्गत प्रस्तावित एनसीडीला क्रिसिल रेटिंग्स लिमिटेड द्वारे 'क्रिसिल ए+/स्थिरपतमानांकन बहाल केले गेले आहे. रोखे विक्रीची प्रधान व्यवस्थापक - जेएम फायनान्शियल लिमिटेड ही कंपनी आहे.

 

इनक्रेड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भूपिंदर सिंग म्हणाले, “आम्ही एक वैविध्यपूर्ण कर्ज देणारी बँकेतर वित्तीय कंपनी म्हणून स्वतःचे स्थान दृढतेने स्थापित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विश्लेषणे आणि आमच्या मालमत्तेच्या गुणवत्तेच्या सामर्थ्याने परावर्तित जोखीम निकषांवर तीव्र स्वरूपात लक्ष केंद्रित करण्यावर आमचा भर राहिला आहे. हा पत जोखीम आणि संकलनतसेच उद्यम कारभाराच्या सर्वोच्च मानकांसाठी प्रयत्न केलेल्या आणि अनेकवार कसोट्यांद्वारे सिद्ध केलेल्या दृष्टिकोनाचा परिणाम आहे. कर्ज देण्याची प्रक्रिया गतिमानसोपी आणि विनासायास करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान आणि डेटा-विज्ञानाचा सतत फायदा घेत असतो. आमचा ठाम विश्वास आहे की तंत्रज्ञान आमच्या प्रक्रियेच्या वेळेत निरंतर कपात करण्यास पुढेही मदत करेलज्यामुळे आमची कार्यक्षमता सुधारेल आणि आम्हाला आमच्या ग्राहकांना चांगली सेवा प्रदान करण्यास मदत मिळेल. आत्तापर्यंतच्या आमच्या वाढीचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे आमच्या दायित्व धोरणाचे यश आहे आणि लवकरच सुरू होणारी एनसीडींची सार्वजनिक विक्री ही आमच्या कर्ज दायित्वाच्या मिश्रणाला आणखी वैविध्य आणि बळकट करण्यात भूमिका बजावेल.”

 

हे एनसीडी / रोखे त्रैमासिक आणि वार्षिक व्याज पर्यायासह ९.४५% ते १०.००% वार्षिक व्याज दर (कूपन दर) प्रस्तुत करतात. रोख्यांमध्ये २७ महिने आणि ३९ महिन्यांचे दोन कालावधी दिलेले आहेत. (कृपया एनसीडीच्या प्रत्येक मालिकेसाठी कूपन दर आणि मुदतीच्या रचनेवरील खालील कोष्टक पाहा.) हे एनसीडी / रोखे मुंबई शेअर बाजार - बीएसई लिमिटेड आणि राष्ट्रीय शेअर बाजार - एनएसई असे दोन्हींवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव असूनबीएसई हे नियुक्त स्टॉक एक्सचेंज आहे.

 

या रोखे विक्रीद्वारे उभारलेल्या निधीपैकी किमान ७५ टक्के निधी पुढील कर्जवित्तपुरवठा आणि कंपनीच्या विद्यमान कर्जाच्या व्याज आणि मुद्दलाची परतफेड करण्यासाठी वापरला जाईल आणि उर्वरित रक्कम सामान्य उद्यम हेतूंसाठी (ही बाब सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (नॉन-कन्व्हर्टेबल सिक्युरिटीजचे इश्यू आणि लिस्टिंग) विनियम२०२१ (“सेबी एनसीएस विनियम”) चे पालन करूनइश्यूमध्ये उभारलेल्या रकमेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त नसलेल्या अशा वापराच्या नियमाच्या अधीन) वापरण्याचा प्रस्ताव आहे.

No comments:

Post a Comment