Wednesday, November 13, 2024

भारतात पुढील पिढीच्या Advantis IoT9 स्मार्ट लॉकचे अनावरण करून लॉक्स बाय गोदरेज ने होम सेफ्टी डे 2024 साजरा केला


- अत्याधुनिक नाईन-इन-वन लॉक फ्युचरिस्टिक ऍक्सेसच्या नऊ मोड्ससह येतो, उद्योगातील अशा प्रकारचे हे पहिलेच लॉक आहे, ऍक्सेस कंट्रोलची पुन्हा व्याख्या करतो

तसेच भारतातील घरमालकांना सक्रिय सुरक्षा उपाय राबवण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ‘माय होम सेफ्टी प्लॅन’ आणि ‘फिअर इज गुड’ मोहीम सुरू केली.

मुंबई, 13 नोव्हेंबर, 2024 (महासागर रिपोर्टर): गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एक भाग असलेल्या गोदरेज आणि बॉईसच्या लॉक्सने, जो आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टम व्यवसायाने विश्वास, गुणवत्ता आणि सुरक्षेसाठी समानार्थी म्हणून ओळखला जातो, आज होम सेफ्टी डे 2024 साजरा केला गेला, ज्याचा उद्देश भारतभर घराची सुरक्षा वाढवण्यासाठी जनजागृती करणे हे आहे. या सोहळ्याची आठवण म्हणून, मजबूत माय होम सेफ्टी प्लॅन लाँच करण्याची घोषणा केली, जो कुटुंबाची सुरक्षितता मजबूत करण्यासाठी दोन भागात राबवला जाणार आहे. कंपनीच्या नवीन 'फिअर इज गुड' मोहिमेसह, घरमालकांना सक्रिय सुरक्षा उपाय करण्यास प्रोत्साहित करते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, त्याने अत्याधुनिक Advantis IoT9 स्मार्ट लॉक देखील सादर केले, या माध्यमातून भारतातील घराच्या सुरक्षिततेसाठी एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे.

शहरी भागात वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता गोदरेजचे लॉक्स घराच्या सुरक्षितता भक्कम करण्याच्या गरजेवर भर देतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, 2024 मध्ये भारतातील गुन्हेगारीचा दर प्रति 100,000 लोकांमागे 445.9 होता; आणि चोरी हा सर्वाधिक घडणारा गुन्हा होता. यामुळेच प्रभावी सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक ठरले आहे. घराची सुरक्षितता सर्वांसाठी सुलभ बनवण्यासाठी, गोदरेजचे लॉक्स माय होम सेफ्टी प्लॅन सादर करत आहेत, कुटुंबाची सुरक्षितता आणखी मजबूत करण्यासाठी हा दोन भागांचा सुरक्षितता उपक्रम डिझाइन केलेला आहे. या प्लॅनमध्ये धोका ओळखण्यासाठी तसेच योग्य उपाय करण्यासाठी तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली होम सेफ्टी चेकअप आणि वैयक्तिक सुरक्षेसंदर्भात सूचना देणारे ऑनलाइन साधन, माय होम सेफ्टी कोटिएंट यांचा समावेश आहे. हे Advantis IoT9 स्मार्ट लॉक भारतीय घरांना लक्षात घेऊन तयार केले आहे.

Advantis IoT9 स्मार्ट लॉक 

गृह सुरक्षा दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना, श्री. श्याम मोटवानी, ईव्हीपी आणि व्यवसाय प्रमुख, लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स, गोदरेज अँड बॉयस म्हणाले, “गेल्या तीन वर्षांत, आम्ही 3,500 पिन कोड अंतर्गत जवळपास 1.5 लाख गृह सुरक्षा तपासणी पूर्ण केल्या आहेत. परिणामी सुरक्षितता उपाय करणाऱ्यांमध्ये 25% नी वाढ झाली आहे. या तपासणीमुळे सुरक्षिततेतील महत्त्वाची तफावत उघड झाली. परिणामी, आम्ही कुटुंबे विश्वास ठेवू शकतील अशा विश्वासार्ह उपायांच्या गरजेवर भर दिला. या वर्षी, आम्ही ‘हर घर सुरक्षित’ मिशनसाठी आमची वचनबद्धता सिद्ध करत आहोत. जी घरांच्या सुरक्षेसाठी देशव्यापी जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा प्रकारचे पहिले Advantis IoT9 स्मार्ट लॉक लाँच करणे ही तंत्रज्ञानाप्रती आमची बांधिलकी आणि भारतीय घरे अधिक सुरक्षित बनवण्याच्या प्रयत्नांचे उदाहरण देते. ‘फिअर इज गुड’ या नावीन्यपूर्ण मोहिमेचा उद्देश घराच्या सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे हे सांगणे आहे. नावीन्य, प्रतिबद्धता आणि सुरक्षिततेसाठी सक्रिय दृष्टिकोन याद्वारे, गोदरेज लॉक भविष्यातील सुरक्षा आव्हानांना आत्मविश्वासाने तोंड देण्यास परिवारांना सक्षम करत आहेत.”

नवीन लाँच केलेले Advantis IoT9 हे गोदरेजचे सर्वात प्रगत आणि खास करून भारतीय घरांसाठी तयार केलेले अत्याधुनिक, भविष्यकालीन गृह सुरक्षा तंत्रज्ञान असलेले, स्मार्ट लॉक रेंजमध्ये एक प्रकारची जोड आहे. हे पुढील पिढीतील स्मार्ट लॉक नऊ अत्याधुनिक सुरक्षा प्रदान करतात. यात वेअरेबल, मोबाइल NFC, वाय-फाय, बायोमेट्रिक, ब्लूटूथ आणि RFID कार्ड प्रवेश समाविष्ट आहे, ज्यामुळे ते बाजारपेठेतील सर्वात अष्टपैलू आणि सर्वसमावेशक समाधान बनले आहे.

डेटा सुरक्षिततेवर गोदरेजच्या फोकसच्या अनुषंगाने, संपूर्ण गोपनीयता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करून, सर्व डेटा सुरक्षित भारतीय सर्व्हरवर एनक्रिप्टेड आणि संग्रहित केला जातो.



Advantis IoT9 ची प्रमुख वैशिष्ट्ये:

वेअरेबल, मोबाईल एनएफसी, ब्लूटूथ, वाय-फाय, बायोमेट्रिक, आरएफआयडी कार्ड, रिमोट कंट्रोल, पासवर्ड/पिन कोड आणि मेकॅनिकल ओव्हरराइड यासारखे फ्युचरिस्टिक  प्रवेशाचे  नऊ मोड

हे कुलूप जगभरातून कोठूनही उघडता येते.

अत्यंत सोपा सेटअप आणि कमांडसाठी इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये आवाज मार्गदर्शन.

लॉकिंग/अनलॉकिंगचा लॉग, ज्याला ऑडिट ट्रेल म्हणतात, त्याचा मोबाइल ॲपद्वारे ऍक्सेस 

अलेक्सा किंवा गुगल होम्स वापरून व्हॉईस कमांड देण्यासाठी सीमलेस इंटिग्रेशनचा वापर 

मर्यादित कालावधीसाठी प्रवेश करण्यासाठी मोबाइल ॲपद्वारे टाइम लिमिटेड पासवर्ड (पिन) तयार केला जाऊ शकतो.

नावीन्यपूर्ण 'फिअर इज गुड' मोहीम ही अशा गोष्टी माझ्यासोबत घडणारच नाहीत, या सामान्य समजुतीला आव्हान देते, आणि असा विचार करण्याऐवजी सावधगिरीचा सकारात्मक दृष्टीकोन देते, जो भारतीय कुटुंबांना सुरक्षिततेला प्राधान्य देण्यास सक्षम करते. प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे या मोहिमेचा ब्रँड अँबेसेडर आहे. याद्वारे ते योग्य साधनांसह जागरूकता आणि गोदरेजचे लॉक्स प्रियजनांचे तसेच मालमत्तेचे संरक्षण करू शकते, हा संदेश घराघरात पोहोचवणार आहेत.

Website: www.godrejenterprises.com | @Godrejlocks #FearIsGood #HarGharSurakshi #HomeSafetyDay

Saturday, October 26, 2024

चित्रकार पूनम राठी यांच्या चित्रप्रदर्शनास कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद २७ ऑक्टोबर पर्यंत नेस्को ग्राउंड गोरेगाव येथे




मुंबई (वार्ताहर):
 प्रसिध्द चित्रकार पूनम राठी यांचे चित्र प्रदर्शन नेस्को ग्राउंड, गोरेगाव येथे सुरू असून त्याला कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्या सदर चित्रप्रदर्शनास बॉलीवुड अभिनेते विंदू दारासिंग, प्रसिद्ध चित्रपट नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव, प्रसिद्ध चित्रकार सदाशिव सावंत यांच्यासहित कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. हे प्रदर्शन २७ ऑक्टोबरपर्यंत कलारसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. 

कलाकार हा मनस्वी असतो. याचं मनस्वी वृत्तीतून कलाकाराच्या ब्रश व पेन्सिल मधून त्यांची भावना कॅनव्हासवर व्यक्त होतं असते. लहानपणापासून पूनम यांना चित्रकलेचा ध्यास होता. ती आवडत पूनम यांनी किशोरवयात सुद्धा मनापासून जपली. लग्नानंतर पण वडिलांनी जशी कलेची आवड ओळखून साथ दिली तशीच साथ नवऱ्यानेही चित्रांच्या जगात पुन्हा जगण्यासाठी दिली. जसा मुर्तीकार आपल्या हाताने मुर्तीला देवाचे रुप देतो त्याप्रमाणे पूनम देखील आपल्या स्केचिंगच्या जादूने देवाचे रुप कॅनव्हासवर उतरवतात. पूनम यांनी काढलेल्या गणपती, विठ्ठलच्या स्केचिंगकडे पाहिल्यावर हुबेहुब साक्षात देवाचे दर्शन घडल्यासारखे वाटते. एवढेच नव्हे पूनम यांनी साकारलेल्या ऍक्रॅलिक किंवा पाण्याच्या रंगातील पेटिंग्सचेही कौतूक करण्यासारखे आहे. 

चित्रकलेबरोबरच पूनम राठींनी जपलेली आणखीन एक आवड म्हणजे कवितांचे लेखन, पुनम राठी यांच्या विविध विषयावरील कविता वाचल्यानंतर त्यांना सामाजिक भानाची असलेली जाण आणि त्याची जाणीव लक्षात येते. कौटुंबिक स्थिरस्थावर झाल्यानंतर पुनम यांनी आपली चित्रकला पुन्हा जोपासली. प्रसिद्ध चित्रकार सदाशिव सावंत यांच्याकडे चित्रकलेतले बारकावे शिकल्यानंतर पुनम राठींच्या हातून अनेक चित्र निर्माण झाली. आपल्या पत्नीच्या कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या नंदकिशोर राठी यांनी पुनम राठी यांच्या चित्रकलांचा सहभाग कला प्रदर्शनात असावा म्हणून सर्व नियोजन योग्य प्रकारे केलं. सुमारे दोन महिने या प्रदर्शनावर काम चालू होतं. पण अचानक नंदकिशोर आणि पूनम राठी यांची कन्या रिनल हिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रदर्शनाआधी पाच दिवस अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. परंतु पूनम राठी खचल्या नाहीत. त्यांना खरा आधार दिला नंदकिशोर राठी यांनी. दिवसभर मुलीची सुश्रुषा, चित्र प्रदर्शनाची तयारी अशा दोलायमान परिस्थितीत पुनम राठी यांनी जिद्द न सोडता चित्र प्रदर्शनात भाग घेण्याचे नक्की केलं होतं. 25, 26, 27 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नेस्को ग्राउंड गोरेगाव येथे आयोजित असलेल्या चित्र प्रदर्शनामध्ये पुनम राठी यांनी आपल्या चित्रांचा प्रदर्शन मांडलं. शो मस्ट गो ऑन असं कलेच्या क्षेत्रात म्हटलं जातं, ते पूनम राठी यांनी खरं करून दाखवलं. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पूनम राठी यांची चित्र विकली गेली. पुनम व नंदकिशोर राठी यांच्यामध्ये असलेली समाजकार्याची भावना त्यांना इथेही गप्प बसू देत नव्हती. पहिल्या दिवशी विकल्या गेलेल्या 2 चित्रांच्या मानधनाचा विनियोग म्हणून ही रक्कम मुंबईतील गतिमंद मुलांच्या संस्थेस  लवकरच हस्तांतरित करण्यात येईल. मुंबईत लवकरच एक स्वतंत्ररीत्या स्वतःच्या चित्रांचे आणखीन एक प्रदर्शन भरविण्याचा चित्रकार पूनम राठी यांचा निर्धार आहे.

Tuesday, October 22, 2024

देशभरातील नामांकित चित्रकारांचे कलाप्रदर्शन दि. २२ ते २८ ऑक्टोबर, २०२४ दरम्यान वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत



मुंबई (वार्ताहर):
देशभरातील नामवंत अशा सात चित्रकांरानी सादर केलेल्या त्यांच्या निवडक अशा वैशिष्टयपूर्ण चित्राकृतींचे प्रदर्शन मुंबईत वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत दि. २२ ते २८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत रोज ११ ते ७ या वेळेत पाहायला मिळणार आहे. 

या प्रदर्शनाचे उदघाटन श्रीमती रत्ना सेठ गोयंका (संचालक, आर्ट करीक्युलम डेव्हलपमेंट पोदार इंटरनॅशनल स्कूल) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गोपाल परदेशी (प्रसिध्द चित्रकार), सुरज लहेरु (संचालक, जे एस आर्ट गॅलरी), बालाजी उभाले (प्रमुख, जे. के. अकादमी आर्ट अॅन्ड डिझाईन वडाळा), अभिनेत्री लेसली त्रिपाठी, प्रख्यात चित्रकार नयना कनोदिया यांच्यासहित कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर प्रदर्शनात रणजित वर्मा (माहुर), राणी प्रसाद (दिल्ली), प्रकाश जाधव (मुंबई), बाळकृष्ण कांबळे (लातूर), राम ओंकार (दिल्ली), मुक्ता गुप्ता (झारखंड), अनामिका (दिल्ली) हया भारतातील विविध राज्यातील सात चित्रकारांचा समावेश असून त्यांच्या चित्राकृतीचा अनोखा आविष्कार रसिकांना पहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन कलारसिकांना २८ ऑक्टोबरपर्यन्त विनामूल्य पाहता येईल.

Sunday, October 20, 2024

आता प्रत्येक घरात पोहोचतील हिऱ्यांचे दागिने - फायरफ्लाय


मुंबई (प्रतिनिधी):
हिऱ्यांचे दागिने घालण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, पण आतापर्यंत भारतीय बाजारपेठेत हिऱ्यांच्या किमती एवढ्या वाढलेल्या होत्या की त्यांच्या या इच्छा पूर्ण होत नव्हत्या. आता भारतीय बाजारपेठेत लॅबमध्‍ये डिझाइन करण्‍यात येणाऱ्या हिऱ्यांच्या दागिन्यांचे जलद गतीने उत्पादन सुरू झाले आहे, जे प्रत्‍येक व्‍यक्तीला परवडणारे आहेत. 

आगामी धनत्रयोदशी आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर फायरफ्लाय ब्रँडने एक अनोखे कलेक्शन बाजारात आणले आहे. फायरफ्लाय कलेक्शनचे वैशिष्टय म्हणजे हे हिऱ्यांचे दागिने सर्वसामान्यांबरोबरच संपन्न व्यक्तींपर्यंत अशा सर्व व्यक्तींच्या बजेटमध्ये सहज बसतात. घाटकोपर येथील आर सिटी मॉलमध्ये शोरूमचे उद्घाटन करताना कंपनीचे सह-संस्थापक आयुष भन्साली म्हणाले की, या लॅब ग्रोन हिऱ्यांची गुणवत्ता इतकी चांगली आहे की लॅबमध्ये डिझाइन करण्‍यात येणारा हिरा आणि नैसर्गिक हिरा यामध्ये कोणताही फरक दिसून येत नाही. 

फायरफ्लायने प्रयोगशाळेत प्रीशियस गोल्डमध्ये हिऱ्यांचे दागिने बनवले आहेत, जे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सहज बसू शकतात. कंपनीचे सह-संस्थापक आदित्‍य भन्साली म्हणाले की, कंपनीचा उद्देश आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता लॅबमध्‍ये डिझाइन करण्‍यात येणारे हिऱ्यांचे दागिने प्रत्येक हिराप्रेमीला उपलब्ध करून द्यायचे आहेत, ज्यांची आजपर्यंत हिऱ्यांचे दागिने घालण्याची इच्छा होती. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे फायरफ्लाय आधुनिक डिझाइन्स, फॅन्सी डिझाइन ज्वेलरी आणि लग्नासाठी व भेटवस्तू म्हणून देण्यासाठी रंगीत हिरे वापरून दागिने तयार करते.

Wednesday, October 16, 2024

‘कोण होणार हिटलर?’ या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे मिळाले ‘क्युट’ उत्तर! ‘मु. पो. बोंबीलवाडी’ मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर


१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांची

मुंबई (प्रतिनिधी): ‘कोण होणार हिटलर?’, या उभ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. ‘मु. पो. बोंबीलवाडी’ या १ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटात हिटलर भूमिकेत आहेत, ज्येष्ठ व लोकप्रिय रंगकर्मी श्री प्रशांत दामले. तीन लागोपाठच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या परेश मोकाशी यांचा हा चित्रपट असल्याने रसिकांमध्ये जी उत्कंठा लागून राहिली आहे, ती हिटलरच्या भूमिकेत प्रशांत दामले असल्याचे जाहीर झाल्याने आता दुपटीने वाढली आहे.

हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅट्रिकनंतर मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी घेऊन येत असलेल्या “मु.पो. बोंबिलवाडी”मधील हिटलरच्या भूमिकेमध्ये कोण आहे, हा लाखमोलाचा प्रश्न रसिकांना पडला होता. हिटलरचा शोध घेण्यासाठी खरे तर प्रेक्षकांचा कल घेण्यात आला आणि त्याला भरघोष  प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर यांचीही नावे या स्पर्धेत पुढे होती. मात्र अंतिमतः शिक्कामोर्तब झाले ते, प्रशांत दामले यांच्या नावावर.

‘कोण होणार हिटलर?’ या प्रश्नावरील पडदा लेखक, दिग्दर्शक परेश मोकाशी, निर्माते मधुगंधा कुलकर्णी आणि विवेक फिल्मस्, मयसभा करमणूक मंडळी यांनी बुधवारी हॉटेल ऑर्किड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उघडला आहे. चित्रपटाचे लेखन -दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे.

हिटलरच्या भूमिकेबद्दल विचारले असता प्रशांत दामले म्हणाले, “मुळात हिटलर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक आकृती येते, प्रकृती येते. मी माझ्या आयुष्यात असला हिटलर केला नाही आणि करणारही नाही. हे जे पात्र आहे त्याला हिटलर का म्हणावे हा प्रश्न पडावा असे हे पात्र आहे. ते करायला मिळावे आणि परेश व मधुगंधाबरोबर करायला मिळावे हे महत्वाचे. परेशबरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे. दिग्दर्शक कसा असावा तर तो असा असावा. तो एक अप्रतिम दिग्दर्शक आहे.”

आजच्या मराठी चित्रपटांबद्दल विचारल्यावर दामले म्हणाले, “मराठी चित्रपटांबद्दल काही मला फार गती नाही, नाटकांबद्दल विचारले तर मी सांगू शकेन. मी फार कमी चित्रपट केले आहेत. दिग्दर्शक सांगेल तसे काम करणे ही माझी प्रकृती आणि वृत्ती आहे. कोरी पाटी घेवून बसले की काम करायला सोपे जाते. यात वैभव मांगले आहे, माझा लाडका दिग्दर्शक अद्वैत परळकर या चित्रपटात अभिनय करतो आहे, त्यामुळे एक वेगळा आनंद हा चित्रपट करताना मिळतो आहे. नाटकातील सर्व मंडळी असल्याने नाटकाचेच चित्रीकरण करतोय की काय असा काय असा भास होतोय मला.”

चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “आम्ही आत्तापर्यंत जेवढे चित्रपट केले त्यानिमित्ताने जेव्हा आम्ही लोकांना प्रीमियर किंवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटायचो तेव्हा लोक परेशला आवर्जून सांगायचे की, तुम्ही ‘बोंबीलवाडी’ नाटक परत आणा. माझेही हे आवडते नाटक आहे, कारण ती एक लाफ्टर राईड आहे. हळूहळू आम्ही जेव्हा याबाबत विचार करायला लागलो तेव्हा आम्हाला असे वाटायला लागले की, या नाटकावर चित्रपट का आणू नये? मग आम्ही ठरवले की या संकल्पनेचे चित्रपटीकरण करून त्याचा चित्रपट करायचा. त्यात आनंदाची बाब म्हणजे प्रशांत दामले यांनी हिटलरचे काम करायला हो म्हटल्यामुळे चित्रपटाचे मूल्य वाढले आहे. चित्रपट आपोआपच मोठा झाला. त्यांनी अप्रतिम काम केले आहे. यात प्रशांत दामले यांच्याबरोबरच वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर हे कसलेले कलाकार आहेत, त्यामुळे एक चांगली भट्टी जमून आली आहे. त्यांचे अभिनय उत्तम झाले आहेत. ही एक धमाल लाफ्टर राईड झाली आहे.”

हिटलरच्या निवडीबाबत बोलताना लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले, “आमचा हिटलर कसा असावा याबाबत चर्चा सुरु होती. हिटलर म्हणजे क्रूर, जगज्जेता, कठोर अशी त्याची प्रतिमा आहे. पण नाटकाचा फार्सिकल बाज पाहता, आमचा हिटलर ‘क्युट’ असावा अशी एक टूम निघाली. आता क्युट हिटलर कोण, असा प्रश्न आल्यावर महाराष्ट्रात क्युट म्हणून ज्याची ओळख आहे, असे एकाच नाव पुढे आले आणि ते म्हणजे प्रशांत दामले. नाटकामधून या कथेचे चित्रपटात रुपांतर होताना जे बदल झाले, मग त्यात वयोगट आला, आज त्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे, याबद्दल चर्चा झाली. त्यातून मग कलाकारांची निवड झाली आणि ती चपखल आहे. त्यातून ही कलाकर मंडळी त्या त्या पात्रांमध्ये अगदी फिट्ट बसली आहेत, आणि ते तुम्ही पहालच.”

प्रशांत दामले यांनी हिटलर कसा दिला आहे, असे तुम्हाला वाटते, असे विचारले असता, मोकाशी म्हणाले, “हा प्रश्न मला खरेतर खऱ्या हिटलर विचारावासा वाटतो, की ‘काय रे तुझे जमले आहे का? तुला असे वगायाला जमेल का आयुष्यात.”

चित्रपटाचे निर्माते विवेक फिल्म्सचे श्री भरत शितोळे म्हणाले, “फिल्म निर्मिती क्षेत्रात आलो आणि ठरवले की मराठी व हिंदी चित्रपट करायचे. पण नेमका कोणता चित्रपट करायचा वगैरे विचारात असताना परेशजी आणि मधुगंधाजींनी ‘मु. पो. बोंबीलवाडी’चा विषय सांगितला. कथा ऐकताचक्षणी मला वाटले की, विवेक फिल्म्सनी या चित्रपटानेच सुरुवात करायला हवी. त्यानिमित्ताने विवेक फिल्म्स आणि मयसभा एकत्र आलो. आम्हाला परेश मोकाशी व मधुगंधाजी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. बरेच काही शिकता आले त्यांच्याकडून. परेशजी हिटलरच्या भूमिकेमध्ये प्रशांत दामलेजीसाठी आग्रही होते. प्रशांत दामलेजी जेव्हा त्या गेटअप मध्ये आले तेव्हा वाटले की, परेशजींची व्हिजन बरोबर आहे. इतका परिपूर्ण आणि क्युट हिटलर दुसरा असूच शकत नाही. आम्ही यापुढेही एकत्र काम करत राहू.”

हा चित्रपट प्रेक्षकांनी का पहावा, असा प्रश्न विचारला असता मोकाशी यांनी मिश्कील उत्तर दिले आहे. “आजकाल व्यायाम नीट होत नाही, त्यामुळे फुप्फुसानाही व्यायाम होत नाही. ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ एवढा हसवतो की त्यामुळे फुप्फुसांना खूप व्यायाम होतो. हे चित्रपट पाहण्याचे आरोग्यदायी कारण आहे.”

Sunday, October 13, 2024

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर यांचे अद्वितीय सूक्ष्म कागद कात्रण कला प्रदर्शन,दि. १५ ते २१ ऑक्टोबर, २०२४ दरम्यान नेहरू सेंटर मध्ये






मुंबई (प्रतिनिधी):
 मुंबई स्थित आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकार, शास्त्रज्ञ, लिमका बूक ऑफ रेकॉर्ड धारक डॉ. महालक्ष्मी के. वानखेडकर यांच्या अद्वितीय अशा सूक्ष्म कागद कात्रण कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईत वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर कलादालनात दि. १५ ते २१ ऑक्टोबर, २०२४ या दरम्यान आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 

स्वत:च्या तल्लख मेंदूने आणि निपुण कलेने निसर्गाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या डॉ. महालक्ष्मी वानखेडकर ह्या जन्मजात निसर्गप्रेमी आहेत. त्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माजी विद्यार्थिनी आहेत त्या जंगल पक्षी आणि कीटक यांची अविश्वसनीय वास्तववादी आणि अद्वितीय 3D कागद कात्रण कला करतात. सध्याच्या प्रदर्शनात शृंगी घुबड, फ्लेमिंगो, पॅराडाईज, हमिंग किंगफिशर, हिमालयन मोनल, ग्रे पीकॉक, निकोबार कबूतर, फ्रूट डव्ह, मंडेरियन डक आणि विविध पक्ष्यांच्या अनेक कलाकृती पहायला मिळतील. 

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर यांनी साकारलेली सर्वात लहान कलाकृती ८ सेमी * १० सेमी आणि सर्वात मोठी ७० सेमी + १२० सेमी आहे. २००७ मध्ये चीनमध्ये झालेल्या जागतिक आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनात एअर इंडियाने त्यांना भारतातर्फे "भारतीय कला आणि संस्कृती" यासाठी प्रायोजित केले होते. २००५ मध्ये त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सूक्ष्म कागद कात्रण कला याचे प्रदर्शन आयोजित केले होते. २०१६ मध्ये "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने" त्यांच्या नावाची नोंद "क्वीन ऑफ टाइनी अँड मायक्रो कटिंग पेपर आर्ट इन बर्ड्स" करण्यात आली. 

साधारणपणे, शिल्पकलेची कल्पना करताना कागद हे अनुकूल माध्यम वाटत नाही, तरीही त्यांनी कागदी कलाकृती वास्तववादी बनविल्या आहेत. पांढऱ्या शुभ्र कागदांवर विविध रंग, आकार आणि पोत यांच्या अद्भुत प्रक्रिया निर्मिती मधून निसर्गनिर्मित पक्षी व जंगल यामध्ये त्यांनी रूपांतरित केल्या आहेत. त्या एका इंचात जवळजवळ दीडशे कात्रण करतात. उत्कृष्ट कल्पना, सृजनशीलता आणि वास्तविकता यांचा अद्वितीय संगम त्यांच्या या कलाकृतींमध्ये दिसून येतो. 

डॉ. महालक्ष्मी यांना वास्तववादी कागद कलेमध्ये दुर्मिळ प्रतिभा आहे. निसर्गप्रेमी असल्याने  निसर्गाची ओढ आहेच आणि निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांच्या अथक प्रयत्नांमधील हा एक प्रयत्न सुरू आहे. एक कलाकार म्हणून काहीतरी अनन्य करण्याचे त्यांनी ध्येय ठेवले होते. त्यांनी त्यांच्या स्वप्नाचा पाठपुरावा केला आणि कागद कात्रण कलेला एक संपूर्ण नवीन आयाम आणि अत्याधुनिक धार दिली. त्यांच्या निर्मितीमध्ये निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांना असे वाटते की ती फक्त १ टक्का जुळू शकते. कारण हे विश्व, हा निसर्ग अद्भुत उर्जेने निर्माण झालेला आहे, ज्यात शास्त्र आणि अध्यात्म याचा संगम आहे आणि मानव तिथपर्यंत पोहोचू शकतच नाही. परंतु तरीही कागदातून जेव्हा या कलाकृती पूर्णत्वाला येतात तेव्हा एक आत्मिक समाधान होते. या कलाकृती खरंच अतुलनीय आहे. त्यांचा संयम आणि चिकाटी, त्यांच्या इच्छाशक्तीसह, त्यांना सर्वात लहान तपशील पूर्ण करण्यास प्रवृत्त करते. पेपर कटिंगमधील त्यांचे तपशील इतके अचूक आहेत की कागदाचा प्रत्येक स्ट्रँड केसांसारखा पातळ आहे. ही अचूकता त्यांनी तयार केलेल्या पक्ष्यांच्या पंखांमध्ये दिसून येते, ज्यामुळे ते जवळजवळ वास्तविक दिसतात. कागदामध्ये स्वतःची उर्जा आणि जीवन आहे यावर विश्वास ठेवून त्या जे काही करतात ते नैसर्गिकरित्या होऊ देतात. प्रत्येकाला आपले सौंदर्य व्यक्त करण्याची मुभा आहे ते व्यक्त होऊ द्यावे आपण त्याच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करावा यावर त्यांचा विश्वास आहे. निसर्ग म्हणजे सर्व सजीव सृष्टीसाठी असणारे बूस्टर. या विश्वातील या पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हे पक्षी. जर हा मूळ घटक या सृष्टीत नसतील तर हे पंचतत्व पूर्णपणे ढासळेल त्याचे असंतुलन होईल म्हणून हे पक्षी संवर्धन आणि संरक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी प्रेरित व्हावे आणि त्यातून निसर्गाशी जवळीक व्हावी म्हणून त्यांच्या प्रकल्पातील पक्ष्यांच्या या कलाकृतींची अद्वितीय निर्मिती केली आहे.

लातूरचे चित्रकार अभिजीत बी. लामतुरे यांच्या अमूर्त चित्रांचे प्रदर्शन दि. १४ ते २० ऑक्टोबर, २०२४ दरम्यान, मुंबईच्या हिरजी जहांगीर आर्ट गॅलरीत






मुंबई (प्रतिनिधी):
 शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक मिळवलेल्या लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील कोकळगांव येथील अभिजीत बी. लामतुरे या नवख्या चित्रकाराचे अमूर्त चित्राचे प्रदर्शन मुंबई येथील हिरजी जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी रोड, काळा घोडा, मुंबई येथे दि. १४ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर, २०२४ पर्यंत सकाळी ११ ते सायकाळी ७ या वेळेत सुरु रहाणार आहे. चित्रकार अभिजीत लामतुरे यांचे प्राथमिक शिक्षण नगरपालीका लातूरच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण श्री देशीकेंद्र विद्यालय लातूर, चित्रकलेचे शिक्षण चित्रकला महाविद्यालय लातूर तसेच भारती विद्यापीठ पुणे, अभिनव कला महाविद्यालय पुणे व जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे झाले. 

ज्याला अस्तित्व नाही, त्याची कल्पना करून कॅनव्हासवर चित्रात मांडणे म्हणजे 'अमूर्त कला" अशी व्याख्या करता येते. साधारणत: स्ट्रोक, शेप, संरचना रंगफार्म, उद्देश आणि समझ भिन्न असल्याने त्या चित्रांमध्ये दिसणारे अर्थ असंख्य असतात. मानवी बुद्धीला ज्ञात असलेल्या सर्व आकारांना काहीना काही संज्ञा आहेत. ब्रम्हांडाच्या अवकाशात असंख्य आकार दृश्य स्वरूपात अस्तित्वात आहेत. त्याची उत्पत्ती एका बिंदूपासून अनेक बिंदू एकत्र येवून झालेली आहे. याला संज्ञा नाही. म्हणून अमूर्त आहेत.

बिंदुपासून जन्माला येणारा महाप्रचंड तारा तुटतो, तेव्हा प्रचंड ऊर्जा उत्सर्जीत करतो, तेव्हा त्याचे कृष्णवीवर तयार होते, हे कृष्णविवर म्हणजे भलामोठा बिंदूतून उत्पन्न झालेला अमूर्त आकार होय. चित्रकार अभिजीत बी. लातूर यांनी पृथ्वी, आप, तेज, वायु, आणि आकाश या पंचमहाभूतांनी - बनलेल्या सौंदर्यसृष्टीतल्या सर्व ज्ञात व अज्ञात आकाराच्या उत्पत्ती मागील मुळ गाभा असलेल्या बिंदूत्वाचा शोध चित्रांमध्ये घेऊन बिंदू, रेषा, आकार, रंग, पोत या पाच तत्वापासून नवनवीन प्रतिमाने निर्माण केलेली आहेत. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव गायतोंडे, प्रभाकर कोलते, अकबर- पदमसी यांचा वसा व प्रेरणा घेवून चित्रकार अभिजीत लामतुरे यांनी ही अमूर्त चित्राकृती साकारली आहे. त्यांचे हे चित्रप्रदर्शन रसिकांना २० ऑक्टोबरपर्यन्त विनामूल्य पाहता येईल.